वीजबिल कमी केले नाही तर जनताच सरकारला ‘शॉक’ देईल

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 13 August 2020

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना जनतेला शॉक द्यायची सवय आहे. मात्र जनता लवकरच तुम्हाला शॉक देईल. जनता सर्व काही बघत आहे, हे लक्षात ठेवा, अशी टीका पाटील यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर केली. ऊर्जामंत्री राऊत यांनी केलेल्या एका विधानाचा संदर्भ देत पाटील म्हणाले की, वीजबिले वाढलेली नाहीत, तर लोकांचा तसा समज झाला आहे. असे राज्याचे ऊर्जामंत्री सांगत असल्याची बातमी वाचनात आली.

मुंबई - लॉकडाउन काळातील वाढीव वीजबिलावरून विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. वीजबिल कमी केले नाही तर जनताच या सरकारला शॉक देईल, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना जनतेला शॉक द्यायची सवय आहे. मात्र जनता लवकरच तुम्हाला शॉक देईल. जनता सर्व काही बघत आहे, हे लक्षात ठेवा, अशी टीका पाटील यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर केली. ऊर्जामंत्री राऊत यांनी केलेल्या एका विधानाचा संदर्भ देत पाटील म्हणाले की, वीजबिले वाढलेली नाहीत, तर लोकांचा तसा समज झाला आहे. असे राज्याचे ऊर्जामंत्री सांगत असल्याची बातमी वाचनात आली. हे वाचून महाराष्ट्राच्या नागरिकांबाबत हे सरकार किती असंवेदनशील आहे? हे पाहून अत्यंत वाईट वाटले. हे तिघाडी सरकार संपूर्णपणे नागरिकांप्रति असलेली आपली जबाबदारी विसरले आहे, असेही पाटील यावेळी म्हणाले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: electricity bill is not reduced the people will shock the government