esakal | अकरावीच्या CETची वेबसाईट बंद; अर्ज भरण्यासाठी मिळणार मुदतवाढ
sakal

बोलून बातमी शोधा

11th CET Website down

अकरावीच्या CETची वेबसाईट बंद; अर्ज भरण्यासाठी मिळणार मुदतवाढ

sakal_logo
By
सम्राट कदम - सकाळ वृत्तसेवा

पुणे : अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक पात्रता प्रवेश परीक्षेच्या (CET) संकेतस्थळात तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे ऑनलाइन अर्ज सादर करण्याची प्रक्रीया तुर्तास बंद ठेवण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे. (Eleventh CET website closed Extension filling up application aau85)

हेही वाचा: अकरावीच्या CETची वेबसाईट बंद; विद्यार्थी हैराण

दहावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी सामाईक प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सन २०२१-२२ च्या इयत्ता अकरावी प्रवेशासाठीची ही परिक्षा २१ ऑगस्टला पार पडेल. त्यासाठी विद्यार्थ्यांना ‘http://cet.mh-ssc.ac.in’ या संकेतस्थळावर अर्ज करायचा आहे. मात्र त्यात आत बिघाड झाल्याने ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया थांबवली असून, ती पूर्ववत झाल्यावर संबंधितांना अवगत करण्यात येईल, असे मंडळाने म्हटले आहे.

हेही वाचा: बारावीचे गुण भरण्याची वेबसाईट 'हँग'; सर्व्हर डाऊन, शिक्षक हैराण

तसेच परिक्षेचे अर्ज भरून देण्यासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज सादर करताना येणाऱ्या अडचणींचं निराकरण करण्यासाठी विभागीय मंडळांचे हेल्पलाइन क्रमांक घोषित करण्यात आले होते. त्यावर मिळालेल्या अडचणी आणि तांत्रिक बिघाड यांच्या आधारे हा निर्णय घेतल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

loading image