Elvish Yadav: एल्विश यादवचा मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो सुषमा अंधारेंनी केला शेअर; म्हणाल्या, ड्रग्ज संबंधी...

एल्विश यादवच्या रेव्ह पार्टीत विषारी नाग आणि विष सापडल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
elvish yadav
elvish yadav

नवी दिल्ली : 'बिग बॉस ओटीटी २'चा विजेता आणि प्रसिद्ध युट्युबर एल्विश यादव याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. नोएडा इथं एका रेव्ह पार्टीमध्ये छापा मारल्यानंतर त्यांनी अनेक विषारी साप आणि सापांचं विष जप्त केलं आहे.

पण याच एल्विश यादवचा मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा फोटो ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर शेअर करत अनेक सवाल उपस्थित केले आहेत. (Elvish Yadav photo with CM Eknath Shinde shared by Sushma Andhare)

एल्विशवर अनेक गुन्हे दाखल

सुषमा अंधारे यांनी एल्विश यादव आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जो फोटो शेअर केला आहे. तो फोटो गणेशोत्सवात काळातला असून एल्विश मुख्यमंत्र्यांच्या घरच्या गणपतीची आरती करताना यात दिसत आहे. (Latest Marathi News)

पण याच एल्विश यादववर यापूर्वी ड्रग्जसह अनेक वादांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. ऑनलाईन सट्टेबाजी करणाऱ्या अॅपची जाहिरातही त्यानं आपल्या युट्यूब चॅनेलवरुन केली आहे.

elvish yadav
Ravindra Waikar: शिवसेना आमदार रविंद्र वायकरांच्या अडचणी वाढल्या; ED कडून केस दाखल

सुषमा अंधारेंचे अनेक सवाल

यापार्श्वभूमीवर मुख्यंत्र्यांवर निशाणा साधताना सुषमा अंधारे म्हणाल्या, "हा एल्विश यादव.....याच्यावर ड्रजशी संबंधित अनेक गुन्हे दाखल आहेत. विषारी सापांपासून ड्रग्स बनवून ते रेव्ह पार्ट्यांना पुरवण्याचे आरोप एल्विशवर आहेत. (Marathi Tajya Batmya)

राज्यामध्ये ठीकठिकाणी ड्रग्सचे साठे, कारखाने आढळत आहेत. त्यात आमचा काही सहभागच नाही किंवा आमचा संबंधच नाही, अशा मखलाशा सरकारकडून रोज केल्या जात आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की, हा एल्विश यादव मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर आरतीसाठी कसा बरं पोहोचला असेल?"

elvish yadav
Maratha Reservation: जरांगेंनी सरकारला दिलेल्या डेडलाईनमुळं संभ्रम? उदय सामंत म्हणाले...

फोनवरुन धमक्या?

फेसबुकवर एल्विश यादव आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो पोस्ट केल्यानंतर अंधारे यांना उत्तर प्रदेशातून फोन आल्याचा दावा त्यांनी केला आहे. आणखी एक पोस्ट करत त्यांनी याचा उल्लेख केला आहे. (Marathi Tajya Batmya)

elvish yadav
Maratha Reservation: जरांगेंनी सरकारला दिलेल्या डेडलाईनमुळं संभ्रम? उदय सामंत म्हणाले...

एल्विशचं म्हणणं काय?

गुन्हा दाखल झाल्यानंतर एल्विशनं म्हटलं की, माझ्यावरचे सगळे आरोप खोटे आहेत. त्यात एक टक्का देखील सत्य नाही. मी युपी पोलिसांना चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य करायला तयार आहे. मी युपी पोलीस, संपूर्ण प्रशासन आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती करतो की, माझी जर या प्रकरणात सहभाग दिसला तर मी याची संपूर्ण जबाबदारी घेतो. (Latest Marathi News)

elvish yadav
Ravindra Waikar: शिवसेना आमदार रविंद्र वायकरांच्या अडचणी वाढल्या; ED कडून केस दाखल

मनेका गांधीचं म्हणणं काय?

एल्विशच्या प्रकरणावर भाजपच्या खासदार आणि पशू हक्क कार्यकर्त्या मनेका गांधी यांनी एल्विश यादव याच्या अटकेची मागणी केली आहे. त्यांनी म्हटलं, एल्विशसारखे लोक हे कायदा तोडून टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळं पोलिसांनी यांना पकडलं पाहिजे.

हा माणून अनेक दिवसांपासून साप गळ्यात घालून नाचतो आहे. तसेच तो रेल्व पार्टीचं आयोजन करतो. अजगर, विषारी नागांना विकून त्यांचं विष काढतो आणि लोकांना ते विकतो. विष विष असतं त्यामुळं जे लोक हे घेतात त्यांना वाटतं की आपल्याला नशा चढते आहे पण खरंतर त्यांच्या किडन्या खराब होत असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com