esakal | पाकिस्तानी हॅकर्सकडून मुंबई सायबर विभागाचे ईमेल हॅक; मेलमध्ये पाठवली पीडीएफ फाईल
sakal

बोलून बातमी शोधा

pakistan hackers

पाकिस्तानी हॅकर्सकडून मुंबई सायबर विभागाचे ईमेल हॅक

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मुंबई : पाकिस्तान (Pakistan) हॅकर्सनी (Hackers) मुंबईतील सायबर पोलिस विभागाचा इमेल हॅक करून सर्व शासकिय ईमेल आयडीवर एक फिशींग मेल डिलीव्हर केला जात आहे. यामध्ये एक पीडीएफ फाईल देखील जोडलेली दिसत आहे. मुंबई पोलिसांच्या पूर्व सायबर पोलीस विभागातून हा ईमेल आल्याचे भासवण्यात आले आहे.

पाकिस्तानी हॅकर्सकडून मुंबई सायबर विभागाचे ईमेल हॅक

पाकिस्तानी हॅकरने मुंबईतील पूर्व सायबर विभागाचे ईमेल हँक केल्याचे तपासात समोर आले आहे. ईमेल हॅक करून डाटा चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे. फिशींग मेलमध्ये एक पीडीएफ फाईल ॲटच करण्यात आली आहे. हा मेल, यामधील लिंक तसेच पीडीएफ फाईल डाऊनलोड केल्यास आपली सर्व माहीती, आयडी संदर्भातील सर्व तपशील हॅकर्सकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासकीय इमेल हॅक होण्याचाही धोका आहे. त्यामुळे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. मुंबई पोलिसांच्या पूर्व सायबर पोलीस विभागातून हा ईमेल आल्याचे भासवण्यात आले आहे.

हेही वाचा: Petrol-Diesel Price Today: काय आहे आजचा भाव; जाणून घ्या

महाराष्ट्र सायबर विभागाने याप्रकरणी सर्व राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधिक्षकांना असा ईमेल आल्यास उघडला जाऊ नये, अश्या सूचना दिल्या आहेत. सायबर विभागाचे पोलीस अधिक्षक संजय शिंत्रे यांनी या सूचना जारी केल्या आहेत. हा ईमेल स्पुफींगचा प्रकार आहे. त्यात एखाद्या व्यक्तीच्या नावाचा वापर करून ईमेल पाठवण्यात येतो. पण प्रत्यक्षात हा ईमेल त्या व्यक्तीने पाठवलेला नसतो.

हेही वाचा: समीर वानखेडेंच्या करिअरमागे 'या' व्यक्तीचा मोठा वाटा; पत्नीचा खुलासा

loading image
go to top