पालघरमध्ये भूकंपरोधक बांधकामांवर भर

पालघरमध्ये भूकंपरोधक बांधकामांवर भर

मुंबई -  पालघरमधील भूकंपाचे धक्के हे नैसर्गिक असून या आपत्तीला तोंड देण्यासाठी राज्य सरकार सर्व त्या उपाययोजना  करत आहे. मात्र, या नैसर्गिक आपत्तीत मालमत्तेचे नुकसान होऊ नये, यासाठी भूकंपाच्या धक्‍क्‍यामध्येही टिकू शकतील अशी सर्व बांधकामांची रचना करणे आवश्‍यक असून त्यासाठी जिल्ह्यामध्ये भूकंपरोधक बांधकामांवर भर द्यावा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

तसेच या आपत्तीला तोंड देण्यासाठी  नागरिकांना प्रशिक्षण द्यावे, भूकंपाच्या घटनांवर लक्ष ठेवून योग्य त्या उपाय योजना करण्यासाठी राष्ट्रीय भूभौतिकीय अनुसंधान संस्थानची (एनजीआरआय) नोडल एजन्सी म्हणून निवड करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

पालघरमध्ये वारंवार होणाऱ्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर विविध तज्ज्ञांची बैठक नुकतीच मंत्रालयात झाली. या बैठकीत भूकंप प्रवण क्षेत्र असलेल्या पालघर जिल्ह्यात काय उपाय योजना राबविण्यात याव्यात, यावर या अधिकारी व या विषयातील तज्ज्ञांची चर्चा झाली. तसेच यावेळी विविध उपाय योजनांवर व एनजीआरआय व हवामान खात्याच्या सूचनांवर चर्चा झाली. पालघरमधील भूकंपाचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने समिती स्थापन केली असून त्याच्या अध्यक्षपदी भारतीय प्रौद्योगिक संस्था, मुंबईचे प्रा. रवी सिन्हा यांची नेमणूक केली आहे.

'सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com