
देशात वाढली नोकऱ्यांची संख्या
मुंबई: कोरोना साथीच्या संकटाचे सावट ओसरत असल्याने आता आर्थिक घडामोडींनाही वेग आला आहे. त्यामुळे देशात नोकर भरतीलाही चालना मिळाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ६ टक्के वाढ झाल्याचे मॉन्स्टर एम्प्लॉयमेंट इंडेक्सने म्हटले आहे. या मार्च महिन्यात १३ पैकी ११ शहरांमध्ये ऑनलाइन भरतीने वर्षापूर्वीची पातळी ओलांडली असून, सर्व महानगरांमध्ये वार्षिक आधारावर दुहेरी अंकात वाढ नोंदवण्यात आली आहे. बंगळुरू आणि पुणे फिनटेक स्टार्टअप क्षेत्रातील दुसरे मोठे हब म्हणून पुढे येत आहे. महानगरांमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर उद्योगासह मनुष्यबळ आणि प्रशासन, वित्त खात्यातील नोकऱ्यांमध्ये दुहेरी अंकातील वाढ दर्शविली आहे.
मार्च २०२२मध्ये बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा या क्षेत्रात सर्वाधिक म्हणजे ३७ टक्क्यांनी वाढ झाली. तर एफएमसीजी, फूड आणि पॅकेज्ड फूड उद्योगातील नोकऱ्या १३ टक्क्यांनी घटल्या आहेत. बहुतांश कंपन्यांनी उच्च व्यवस्थापन स्तरावरील कर्मचारी नियुक्त केले असून हे प्रमाण ३४ टक्के आहे. मध्यम-वरिष्ठ स्तरावरील भरती २२ टक्क्यांनी तर त्याखालील स्तरावरील भरती २० टक्क्यांनी वाढली आहे.
कोरोना साथीच्या दोन वर्षांच्या आव्हानात्मक काळावर मात करत देशातील अर्थव्यवस्थेने चांगलाच वेग घेतला असून, या वर्षी नोकर भरतीत कोविडपूर्व पातळीपेक्षा सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. छोट्या शहरांमध्येदेखील नोकऱ्यांमध्ये वाढ दिसत आहे. रोजगार निर्मितीच्या पुनरुज्जीवनात बँकिंग आणि दूरसंचारसारख्या क्षेत्रांनी मोलाचे योगदान दिले आहे,
- शेखर गरिसा, सीईओ, मॉन्स्टर डॉट कॉम
शहरे शहर वाढ
मंुबई २१
कोईम्बतूर २०
चेन्नई १६
हैदराबाद १६
बंगळुरू १५
दिल्ली-एनसीआर १३
कोलकाता १३
पुणे १२
क्षेत्र वाढ बँकिंग ३७
टेलिकॉम १७
उत्पादन १६
हॉस्पिटॅलिटी ११
या क्षेत्रांमध्ये घसरण
अभियांत्रिकी २०
प्रसारमाध्यम १६
Web Title: Employment After Covid India
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..