अभियांत्रिकीच्या प्रवेशाचा घोळ..!

Admission
Admission

मुंबई - व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रम प्रवेशासाठी प्रवेश घेताना दुसऱ्या फेरीपर्यंत जातवैधता पडताळणी प्रमाणपत्र देण्याचा नियम अचानक बदलल्याने विद्यार्थी व पालक हवालदिल झाले आहेत. प्रवेशाच्या पहिल्या फेरीच्या अंतिम तारखेपर्यंतच जातवैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची अट नव्याने घातल्याने आरक्षित प्रवर्गासह मराठा आरक्षण (एसईबीसी) व आर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर नवा पेच उभा राहिला आहे. 

आज अभियांत्रिकी प्रवेशाच्या पहिल्या फेरीची सुरवात झाल्यानंतर ही बाब समोर आल्याने एकच गोंधळ उडाला असून, मराठा व आर्थिक दुर्बल आरक्षणाचा लाभ घेणारे शेकडो विद्यार्थी वंचित राहण्याची भीती आहे.
आजपासून अभियांत्रिकीच्या पहिल्या फेरीच्या प्रवेशाची सुरवात झाली. यामध्ये जातवैधता प्रमाणपत्र एक जुलैपर्यंतच सादर करण्याची अट घालण्यात आली आहे. या अगोदरच्या परिपत्रकानुसार दुसऱ्या फेरीच्या म्हणजेच १३ जुलैपर्यंत हे प्रमाणपत्र देण्याचे सांगण्यात आले होते.

मराठा व आर्थिक दुर्बल आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी जातीची प्रमाणपत्रे काढलेली असली, तरी जातवैधता समितीकडून त्यावर अद्याप मोहोर लागलेली नाही. प्रत्येक जिल्ह्यात जातवैधता समितीकडे प्रतंड व्याप व प्रलंबित प्रमाणपत्र असल्याने पुढील सात दिवसांत हे काम उरकणे शक्‍यच नसल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीपर्यंत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची सलवत असतानाही उच्च व तंत्रशिक्षण विभागाने आजचे नवे परिपत्रक काढण्यामागचा हेतू काय, असा सवाल केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com