एरंडोल-येवला राज्यमार्गाचे रूप पालटणार

सुधाकर पाटील
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

चाळीसगाव-जळगाव रस्त्याचे भाग्य उजाळले असतांना आता एरंडोल-येवला राज्य मार्गाचे ही रूपडे पालटणार आहेत. या रस्त्यासाठी जवळपास 247 कोटी रूपये मंजुर झाले आहेत. कामाची निविदा प्रक्रिया पार पडली. त्यामुळे लवकरच हे काम सुरू होणार आहे. ' हायब्रीड अॅन्युइटी' योजनेअंतर्गत या रस्त्याचे काम होत आहे.

भडगाव - चाळीसगाव-जळगाव रस्त्याचे भाग्य उजाळले असतांना आता एरंडोल-येवला राज्य मार्गाचे ही रूपडे पालटणार आहेत. या रस्त्यासाठी जवळपास 247 कोटी रूपये मंजुर झाले आहेत. कामाची निविदा प्रक्रिया पार पडली. त्यामुळे लवकरच हे काम सुरू होणार आहे. ' हायब्रीड अॅन्युइटी' योजनेअंतर्गत या रस्त्याचे काम होत आहे.

चाळीसगाव ते जळगाव या राज्य मार्ग क्रमांक 19 चे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात झाले. त्यामुळे हा रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाने हाती घेतले आहे. त्यामुळे जळगाव ल नाशिक जाणे  गिरणा पट्ट्यातील लोकांना सोपे व वेगवान झाले आहे. शासनाने गिरणा पट्ट्यातुन जाणारा राज्य मार्ग क्रमांक 25 एरंडोल- येवला याला ही मंजुरी दिली आहे. त्यामुळे गिरणा पट्ट्यासाठी दुसरी आनंदाची बातमी आहे.

एरंडोल-येवला मार्ग चकाकणार 
राज्य शासनाने एरंडोल-  येवला या राज्यमार्गाच्या जळगाव जिल्ह्यातील रस्त्याच्या कामाला 'हायब्रीड अन्युइटी' योजनेअंतर्गत मंजुरी दिली आहे. यासाठी जवळपास 247 कोटी खर्च अपेक्षित आहे.  यात एरोडंल ते बहाळ 50 कीलोमीटर लांबीसाठी 139 कोटी तर बहाळ ते सायगाव 56 कीलोमीटर 107 कोटी रूपये मंजुर करण्यात आले आहेत. हा मार्ग पुर्णत: दुर्लक्षित होता. या मार्गाच्या कामामुळे गिरणापट्ट्याला मोठा फायदा होणार आहे. हा रस्ता एरंडोल, भडगाव, कोळगाव, बहाळ, जामदा, मेहुणबारे, वरखेडे, उपखेड, पिलखोड, सायगाव असा आहे. 

लवकरच होणार काम सुरू
एरंडोल ते सायगाव या 106  कीलोमीटरच्या कामाची निविदा प्रक्रिया पार पडली असुन लवकरच कार्यारंभ आदेश संबधित ठेकादाराला देण्यात येणार आहे. त्यामुळे हे काम सुरू करण्यात येणार आहे. हे काम दोन वर्षात पुर्ण करण्यात येणार आहे. संबंधित ठेकेदाराला आता साठ टक्के तर पुढील दहा वर्षांच्या कालावधीत उर्वरीत चाळीस टक्के नीधी दिला जाणार आहे. तर रस्ता पुर्ण झाल्यानंतर दहा वर्षे त्याची देखभाल संबधित ठेकेदारांना करायची आहे. हा रस्ता दहा मीटर रूदिंचा असुन डांबरीकरण करण्यात येणार आहे. तर गावात काॅक्रींटकरण करण्यात येणार आहे.  

गिरणापट्याची वाहतुक होईल वेगवान
एरंडोल -येवला राज्यमार्गाचे काम होत असल्याने गिरणा नदिच्या समांतर असलेल्या या रस्त्यामुळे वाहतुक अधिक गतीमान होणार आहे. नाशिक जिल्ह्यात विषेशत: नांदगाव, मालेगाव जाणे सोपे होणार आहे. पर्यायाने भाजीपाला विक्रेते शेतकर्याना बाजारपेठेत सहज जाता येणे शक्य होणार आहे. तर या भागातुन वाहतुक वाढुन विकासालाही चालना मिळु शकणार आहे. जळगाव ते चांदवड राष्ट्रीय महामार्गानंतर गिरणा पट्ट्यात रस्त्याचे महत्वाचे काम होऊ घातले आहे. 

राज्यमार्ग 25 च्या कामाची निविदा प्रक्रिया पुर्ण झाली आहे. त्यामुळे लवकरच प्रत्यक्षात काम सुरू होईल. या मार्गामुळे या भागाच्या विकासाला चालना मिळेल.तर शेतकर्यानी पिकवलेला नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठेत नेणे सोपे होईल. - आमदार कीशोर पाटील पाचोरा-भडगाव 

राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर 15 वर्षापासुन प्रलंबित रस्त्याला हायब्रीड अन्युइटी मधुन मंजुरी मिळाली. दोन जिल्ह्याला जोडणारा हा मार्ग आहे. तो रस्ता होत असल्याचे मोठे समाधान आहे. - आमदार उन्मेश पाटील चाळीसगाव

Web Title: Erandol-Yeola will change the way of the state