
पुणे – मराठी डिजिटल माध्यमाच्या विश्वात मोठी झेप घेत ‘ई-सकाळ डॉट कॉम’ने आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. प्रतिष्ठेच्या कॉमस्कोअर (ComScore) अहवालानुसार, जानेवारी २०२५ मध्ये ई-सकाळ ही भारतातील सर्वाधिक वाचली जाणारी मराठी न्यूज वेबसाईट ठरली आहे.
कॉमस्कोअर हा डिजिटल माध्यम क्षेत्रातील विश्वासार्ह अहवाल मानला जातो. यंदाच्या जानेवारी महिन्यात तब्बल १.३५ कोटी युझर्सनी ‘ई-सकाळ’ला भेट दिली, ही आकडेवारी वाचकांचा विश्वास आणि प्रेम अधोरेखित करणारी आहे.