#स्पर्धापरीक्षा -अमली पदार्थ सेवन आणि क्रीडा विश्व

सुनंदन लेले 
सोमवार, 26 जून 2017

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील लेख www.esakal.com वर प्रसिद्ध करण्यात येत आहेत.  स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी  http://sakalpublications.com वर पुस्तके उपलब्ध आहेत. 

गेल्या वर्षी  एकीकडं पंजाबमधल्या अमली पदार्थ सेवनाच्या विषयावर आधारलेला आणि वादांच्या भोवऱ्यात सापडलेला "उडता पंजाब' चित्रपट प्रदर्शित झाला, त्या अगोदर मारिया शारापोवाला 
"मेल्डोनीयम' नावाच्या कामगिरी सुधारण्याकरिता वापरल्या जाणाऱ्या औषधाच्या सेवनाकरिता दोषी ठरवलं गेलं. त्यानंतर जमैकाच्या 4 बाय 100 मीटर शर्यत संघातला एक थलिट नेस्टा कार्टर त्याच प्रकारच्या प्रकरणात पकडला गेल्याची बातमी आली. हे सगळं होईतोपर्यंत रशियाच्या संपूर्ण ट्रॅक अँड फिल्ड संघाला रिओ ऑलिंपिक्‍सपासून दूर ठेवायचा अत्यंत कठोर निर्णय इंटरनॅशनल मॅच्युअर थलॅटिक्‍स फेडरेशनला घ्यावा लागला आहे. कुठं तरुण पिढी नशेकरिता अमली पदार्थांचं सेवन करू लागली आहे, तर दुसरीकडं खेळाडू कसंही करून जिंकायच्या ईर्षेने पेटून चुकीची पावलं उचलताना मागं- पुढं बघत नाहीत. भयानक बाब अशी आहे, की तरुण पिढीला त्यांचे पालक रोखू शकत नाहीत. रशियाच्या प्रकरणात तर संगनमत करून खेळाडूंना परफॉरमन्स एनहान्सिंग ड्रग्ज समजून उमजून दिलं गेल्याचं समोर येत आहे. हे सगळं भयावह नाही वाटत तुम्हाला? 

इतिहास अमली द्रव्यसेवनाचा 
सेऊल ऑलिंपिक्‍स स्पर्धेत 1988 मध्ये कॅनडाच्या बेन जॉन्सननं 9.79 सेकंदांत 100 
मीटरची शर्यत जिंकून सुवर्णपदक पटकावलं. त्याची धाव बघून जगानं तोंडात बोटं घातली. नंतर काही दिवसांतच बेन जॉन्सन परफॉरमन्स एनहान्सिंग ड्रग्ज स्टीरॉईड घेत असल्याचं उघडकीस आलं. त्याची विश्‍वविक्रमी धाव रद्द ठरवून त्याचं सुवर्णपदक काढून घेतलं गेलं. 

1999 ते 2005 दरम्यान तब्बल 7 वेळा टूर दी फ्रान्स सायकल शर्यत जिंकणाऱ्या लान्स आर्मस्ट्रॉंगचं नाव क्रीडा जगतात आदरानं घेतलं जात होतं. कर्करोगासारख्या भयानक रोगावर मात करून लान्स आर्मस्ट्रॉंगनं "टूर दी फ्रान्स'सारखी मानाची आणि खेळाडूच्या क्षमतेची टोकाची कसोटी बघणारी शर्यत जिंकल्यानं त्याला जग मानू लागलं. त्याच लान्स आर्मस्ट्रॉंगनं 'टूर दी फ्रान्स'च्या 100व्या वाढदिवसालाच दिलेल्या खळबळजनक मुलाखतीत सांगितलं की, "परफॉरमन्स एनहान्सिंग ड्रग्ज घेतल्याशिवाय सातत्यानं टूर दी फ्रान्स शर्यत जिंकणं अशक्‍य आहे... ही शर्यत खेळाडूच्या स्टॅमिनाची सत्त्वपरीक्षा बघते, ज्यात सातत्यानं जास्त ऑक्‍सिजनचा पुरवठा केला तरच ध्येय गाठता येतं... मी तसं केलं... ईपीओ + ब्लड ट्रान्सफ्युजन आणि टेस्टेस्टेरॉनसारखे उपाय गुपचूप करून मी माझं ध्येय साध्य केलं... मला कसंही करून जिंकायचं होतं बास,'' लान्स आर्मस्ट्रॉंगने कबुली दिली आणि जग हादरून गेलं. एका दिवसात लान्स आर्मस्ट्रॉंग "हिरो'चा "झिरो' झाला. 

काही दिवसांपूर्वी जमैकाच्या 4 बाय 100 मीटर शर्यतीतला एक खेळाडू नेस्टा कार्टर 
परफॉरमन्स एनहान्सिंग ड्रग्ज घेताना सापडल्याचं जाहीर झालं. 2004 पासून बंदी घातलेलं 
"मेथीलहेक्‍झानामाईन' नावाचं औषध घेताना कार्टर पकडला गेला आहे. ऑलिंपिक समितीचा निर्णय असा आहे, की रिले संघातील एक खेळाडू परफॉरमन्स एनहान्सिंग ड्रग्ज घेताना पकडला गेला तरी त्यांचं सुवर्णपदक काढून घेतलं जाईल आणि त्या संघालाच पुढील ऑलिंपिक्‍समधून बाद ठरवलं जाईल. म्हणजेच कार्टरनं चुकीचं कृत्य केल्यानं उसेन बोल्टला काही चूक नसताना एका सुवर्णपदकापासून लांब राहावं लागणार आहे. 
 

Web Title: esakal news competitive exam series upsc mpsc sports doping drugs