प्लॅस्टिकच्या अभ्यासासाठी समितीची स्थापना

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 17 एप्रिल 2018

मुंबई - प्लॅस्टिकचे उत्पादन, वापर आणि नष्ट करण्यासंदर्भात उद्योजकांनी सुचविलेल्या पर्यायावर अभ्यास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिव पातळीवरील एका समितीची स्थापना केली आहे.

मुंबई - प्लॅस्टिकचे उत्पादन, वापर आणि नष्ट करण्यासंदर्भात उद्योजकांनी सुचविलेल्या पर्यायावर अभ्यास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिव पातळीवरील एका समितीची स्थापना केली आहे.

आज मंत्रालयात प्लॅस्टिक उद्योजकांच्या बैठकीत प्लॅस्टिकचा वापर आणि नष्ट करण्याबाबत चर्चा झाली. या वेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री रामदास कदम, शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे उपस्थित होते. सचिव पातळीवरील समितीत मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, पर्यावरण विभागाचे अपर मुख्य सचिव सतीश गवई, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अनबलगन यांचा समावेश आहे. ही समिती उद्योजकांनी सादरीकरणातून मांडलेल्या मुद्द्यांचा अभ्यास करून प्लॅस्टिकबंदीबाबत आपला अहवाल सरकारला सादर करणार आहे.

Web Title: The establishment of a committee for the study of plastic