esakal | राज्यात गरजेनुसार सायबर पोलिस ठाण्यांची स्थापना
sakal

बोलून बातमी शोधा

गृहमंत्री वळसे पाटील

राज्यात गरजेनुसार सायबर पोलिस ठाण्यांची स्थापना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील सायबर गुन्ह्यांत (cyber crime) वाढ होत असल्याने, पिंपरी चिंचवड पोलिस (pimpri chinchwad)आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील सायबर पोलिस ठाण्याच्या धर्तीवर राज्यात गरजेनुसार युनिटनिहाय सायबर पोलिस ठाण्यांची स्थापना केली जाईल. शिवाय सायबर गुन्ह्यांच्या उकलीसाठी राज्यभरात अद्ययावत अशा ४५ न्यायवैद्यक प्रयोगशाळा (फॉरेन्सिक लॅबोरेटरीज) स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गुरुवारी (ता.९) पुण्यात बोलताना दिली.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने आयोजित केलेल्या वार्तालापप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर, सरचिटणीस सुजित तांबडे, पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे आदी उपस्थित होते.

वळसे पाटील म्हणाले, ‘‘राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता पोलिस खात्यात पुरेसे मनुष्यबळ असणे आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने राज्यात पोलिसांच्या एकूण १२ हजार २०० जागा भरल्या जाणार आहेत. त्यापैकी पाच हजार २०० पदांची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. ही प्रक्रिया संपल्यानंतर र उर्वरित सात हजार पदे भरली जाणार आहेत. पोलिस गृहनिर्माण मंडळामार्फत पोलिसांसाठी घरे बांधण्यास प्राधान्य दिले जात आहे. यासाठी दरवर्षी सातशे कोटी रुपयांची तरतूद केली जात आहे.

हेही वाचा: केंद्राच्या सुचनेवरुनच राणे कुटुंबियांविरोधात कारवाई - वळसे

वळसे पाटील यांच्या प्रमुख घोषणा

  • संकटात सापडलेल्या नागरिकांना १५ मिनिटात मदत मिळणार

  • नागरिकांच्या मदतीसाठी ११२ हा हेल्पलाइन क्रमांक कार्यान्वित करणार

  • या हेल्पलाइन क्रमांकांचे लवकरच लोकार्पण

  • मराठा क्रांती मोर्चातील १०९ खटले मागे घेण्याचा सरकारचा निर्णय

  • महिला सुरक्षेसाठी ‘शक्ती कायदा’ विधेयक

  • शक्ती कायदा विधेयक आगामी अधिवेशनात मंजुरीसाठी मांडणार

  • पोलिस नियंत्रण अद्ययावत करणार

  • पन्नास वर्षांपुढील गृहरक्षक दलाच्या जवानांना किमान १८० दिवस काम देणार

  • राजकीय नेते फोन टॅपिंग प्रकरण उच्चस्तरीय चौकशी समितीकडे देणार

  • चौकशी समितीच्या शिफारशींनुसार दोषींवर कारवाई

loading image
go to top