

Ethanol Production Restrictions
esakal
पुणे: देशात साखरेचे भाव विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. त्यातच कमी पावसामुळे यंदा उसाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखरेचे उत्पादन वाढविण्यासाठी सरकारकडून उसापासून इथेनॉल निर्मितीवर निर्बंध आणण्याचा विचार सुरू असल्याची माहिती वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि साखर कारखान्यांच्या सूत्रांनी दिली. ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, सप्टेंबरमध्ये संपणाऱ्या चालू हंगामात कारखान्यांनी एकूण साखर उत्पादनाच्या १० टक्के म्हणजेच ३० लाख टन साखर इथेनॉल निर्मितीसाठी वळवली आहे.