"प्रधानमंत्री असले तरी मोदी प्रत्येक निवडणुकीच्या प्रचाराला जातात" - Pankaja Munde | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pankaja Munde

Pankaja Munde : "प्रधानमंत्री असले तरी मोदी प्रत्येक निवडणुकीच्या प्रचाराला जातात"

नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास हे सांगितले. मोदी देशाचे प्रधानमंत्री असले तरी देशातील प्रत्येक छोट्या मोठ्या निवडणुकीच्या प्रचाराला जातात. जेव्हा ते प्रचाराला जातात तेव्हा ते संघटना म्हणून जात असतात. तसेच जेव्हा ते निर्णय घेतात. तेव्हा ते देशाचा प्रथम नागरिक म्हणून निर्णय घेत असतात. असा नियम आमदार, खासदारांना देखील असला पाहिजे, असे भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या.

भाजप नेत्या पंकजा मुंडे २०२४ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा मैदानात उतरल्या आहेत. आज बीड जिल्हा भारतीय जनता पार्टी बूथ सशक्तीकरण, जिल्हा प्रशिक्षण वर्ग व जिल्हा कार्यकारिणी बैठक मुंडे यांनी घेतली. यावेळी त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केले.

पंकजा मुंडे म्हणाल्या, माझ्या पराभवाविषयी सुरेश धस म्हणाले सर्व मोठे नेते पराभूत झाले. पण मला पराभवाच्या वेळेमध्ये जे शिकायला मिळालं ते अभुतपूर्व आहे. माझ्या पराभवाचे दु:ख मला न होता राज्यातील जनतेला झाले.

मला केंद्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली. मी सचिव म्हणून मिटींग घेते तेव्हा मंचावरुन मोदीजी एकही मिनिट देखील उटत नाहीत. पुर्णवेळ ते बैठकीत लक्ष देतात, असे मुंडे यांनी सांगितले.