सावरकरांना भारतरत्न नाही दिला तरी चालेल: देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis
Devendra Fadnavisesakal

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ममता बॅनर्जींच्या दौऱ्याबाबत महत्त्वाची विधाने केली आहेत. त्यांनी म्हटलंय की, काँग्रेसला वगळून सगळ्या पक्षांना एकत्र आणून मोट बांधण्याचे ममता-पवारांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी या राजकीय बैठका होत आहेत. तसेच ते म्हणाले की, सावरकरांना भारतरत्न नाही दिला तरी चालेल मात्र, शिवसेनेचं बेगडी हिंदुत्व जनतेला आवडणार नाही, असं त्यांनी म्हटलंय.

या भेटी राजकीय

फडणवीस म्हणाले की, ममता बॅनर्जींचा कालचा दौऱ्यामध्ये उद्योग आकर्षित करणे हा मुद्दा दिखाऊ होता. मूळ अजेंडा होता तो राजकीय होता. सगळ्यांनाच हे मान्य असेल की 2024 ला देखील मोदीच सत्तेत येणार आहेत. त्यामुळे त्यांना हरवण्यासाठी म्हणून काय रणनीती करता येईल, याकरिता ही खलबतं चालली आहेत की कसं सगळ्यांना एकत्र येता येईल. असले प्रयोग 2019 सालीही झाले. पण त्या प्रयोगांना यश आलं नाही. 2024 लाही लोक मोदींवरच विश्वास ठेवतील. या सगळ्यांच्या भानगडीमध्ये लक्षात येतंय की काँग्रेसला बाजूला ठेवून तिसरी आघाडी तयारी करण्याचे प्रयत्न ममता बॅनर्जींचे सुरु आहेत आणि त्याला पवार साहेबांची साथ दिसतीय. त्याला काल काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया आलेली आहे. हा सामना त्यांचा अंतर्गत आहे. नंतर मग आमच्याशी काय लढायचं ते ठरवतील.

काँग्रेसविरहीत आघाडीसाठीचे हे प्रयत्न

भाजपविरोधी सगळ्या पक्षांना एकत्र घेऊन जायचं या पवारांच्या विधानामध्ये सुप्त अर्थ असा आहे की, काँग्रेस सोडून सगळ्या पक्षांनी एकत्र यायचं. पवार साहेबांची वक्तव्य बिट्वीन द लाईन्स असतात तर ममता दिदी थेट बोलतात. दोघांचं बोलणं एकच आहे. त्यांना काँग्रेसला बाजूला ठेवायचं आहे आणि आघाडी उभारायची आहे. ममता दिदी नॉर्थ-इस्ट अथवा गोव्यात का लढतायत, ते यासाठीच की त्यांना सध्या काँग्रेसविरोधातील आघाडीसाठी मैदान तयार करायचं आहे. त्यांच्या पक्षाचं विधानही तसंच आहे की, आम्हीच खरी काँग्रेस आहोत आणि काँग्रेस संपलेली आहे. त्या सगळ्या मताला पवारांचं समर्थन आहे. त्यांचंही मत तेच आहे, मात्र राज्यातील परिस्थिती त्यांना अनुकूल नसल्याने ते त्यांच्यासोबत आहेत.

"सावरकरांना भारतरत्न नाही दिला तरी चालेल"

शिवसेनेचे नेते म्हणतात की, पश्चिम बंगाल कुणासमोर झुकणार नाही तसेच महाराष्ट्रही कुणासमोर झुकणार नाही, या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, जागा किती आहेत तर फक्त 56 आणि बाता मात्र मोठ्या आहेत. शिवसेनेने किती लांगुलचालन केलं तरी त्याचा फायदा होणार नाही. मतांसाठी हिंदुत्वविरोधी पक्षाला डोक्यावर घेऊन फिरावं लागतंय.

शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी 'माफी मागायला मी काय सावरकर नाही' असं विधान केलंय. त्याबाबत प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले की, आता तर शिवसेनेचं बेगडी सावरकर प्रेम थेटपणे उघड झालं आहे. आतापर्यंत त्यांच्या मित्रपक्षाचे लोक सावरकरांना शिव्या द्यायचे आणि आतातर त्यांच्याच पक्षातले लोक असं बोलायला लागलेत. त्यांच्या मित्र पक्षातील लोक उठून म्हणतात की, सावरकरांना भारतरत्न देता कामा नये. अरे, नका देऊ भारतरत्न... सावरकर पर्मनंट भारतरत्न आहेत, पण किमान त्यांचा अपमान तरी करु नका, असं विधान देंवेंद्र फडणवीस यांनी केलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com