"कोणाचा बाप जरी आला तरी..."; नवनीत राणांचा निर्वाणीचा इशारा

बेकायदा उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा अमरावती महापालिकेनं हटवल्यानं शहरात मोठ्या प्रमाणावर तणावाचं वातावरण झालं आहे.
navneet rana
navneet rana

अमरावती : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरुन सुरु झालेल्या वादामध्ये खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या १९ फेब्रुवारीपर्यंत जर आम्हाला पुतळा बसवण्याची परवानगी मिळाली नाही तर कोणाचा बाप जरी आला तरी आम्ही पुतळा बसवूच, असा इशारा त्यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे. (Even if someone father came Navneet Rana warning due to Amravati tension)

नवनीत राणा म्हणाल्या, "१९ फेब्रुवारीपूर्वी आम्हाला अमरावती महापालिकेनं राजापेठ उड्डाणपूलाजवळ शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या द्याव्यात. अन्यथा १९ फेब्रुवारीपूर्वी आम्ही तिथं पुतळा उभारू, याविरोधात कोणाचा बाप जरी आला तरी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची तिथेच स्थापना होईल, हे मी खुलेआम सर्वांना आव्हान देते. त्यावेळी मी आणि शिवप्रेमी पाहतो कोण आडव येतंय?"

आम्हाला पोलिसांनी नजरकैदेत का ठेवलंय? हे आम्हाला कळत नाहीए. कोणता गुन्हा आम्ही केला आहे? शिवाजी महाराजांचे विचार लोकांच्या मनात रुजावेत म्हणून आम्ही पुतळा उभारला होता. पण पोलिसांनी आमच्या घराबाहेर मोठा फौजफाटा तैनात केला. जसं कोणी दहशतवाद्यावर त्यांना नजर ठेवायची आहे, असा आरोपही यावेळी नवनीत राणा यांनी केला.

काय घडलं नक्की?

बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभीमान पक्षाच्यावतीने राजापेठ उड्डाणपुलाजवळ रात्रीतून छत्रपती शिवाज महाराज यांचा पुतळा बसवला होता. याची माहिती कळताच अमरावती महापालिकेने रात्रीतूनच हा पुतळा हटवला. बेकायदा पद्धतीनं हा पुतळा उभारण्यात आला होता, असं महापालिकेन याबाबत माहिती देताना सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com