आदिवासी पाड्यातील मनीषा करणार एव्हरेस्ट सर 

दीपा कदम
मंगळवार, 10 एप्रिल 2018

मुंबई - चंद्रपूरमध्ये डोंगरकपारीत मनीषा धुर्वेचा झुलवडी हा आदिवासी पाडा आहे. त्या पाड्यावर पण सातच घरे. आदिवासी आश्रमशाळेपलीकडे घराकडे जाताना दिसणारे लहान मोठे डोंगर तिला माहीत होते. सपाटीवर घर असल्याने डोंगरांशी तिचा फार परिचय नव्हता. डोंगर पूर्णपणे बर्फाने आच्छादलेला असतो याची कधीही कल्पनाही मनीषाने केली नव्हती. ती आता एव्हरेस्टची चढाई करण्यासाठी तिच्या सारख्याच इतर नऊ आदिवासी मुलांबरोबर निघालीय. 

नक्षलग्रस्तांसाठी आणि कुपोषणासाठी कायम चर्चेत राहणाऱ्या आदिवासी विभागाने प्रथमच एका स्वच्छ आणि भव्यदिव्य ध्येयाची प्रेरणा देणाऱ्या एव्हरेस्ट मोहिमेची आखणी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी केली. विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांच्या कल्पनेतून ही मोहीम आखण्यात आली आहे. लेह लडाखमध्ये जानेवारी महिन्यात उणे 25 इतकी गोठवणारी थंडी असतानाच्या काळात या मुलांना प्रशिक्षण देण्यात आले. या वातावरणात यशस्वी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या मुलांची निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या मुलांमध्ये मनीषा धुर्वे, प्रमेश आळे, उमाकांत मडवी, आकाश मडवी, आकाश अत्राम, शुभम पेंदोर, कविदास कातमोडे, विकास सोयाम, इंदू कन्नाके, छाया अत्राम यांचा समावेश आहे. 

दहा महिन्यांपूर्वी ही मुले खूप लाजरी आणि अबोल होती. कठोर मेहनतीसाठी मात्र ही मुले कायम तयार होती. त्यांना मनाने आणि शरीराने तयार करण्याचे मोठे आव्हान आमच्यासमोर होते. जवळपास दहा महिने सहा टप्प्यांमध्ये या मुलांना प्रशिक्षण देण्यात आले. जुलै 2017 मध्ये चंद्रपूरमधील आश्रमशाळा बोर्डा, देवाडा आणि जिवती या शाळांमधून धावण्याच्या शर्यतीतून 50 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. आंध्र, दार्जिलिंग, आणि लेह लडाख येथे पर्यंत झालेल्या कठोर प्रशिक्षणातून पहिल्या टप्प्यापासून शेवटच्या टप्प्यापर्यंत "ए' ग्रेड मिळवलेल्या 10 विद्यार्थ्यांची निवड एव्हरेस्टच्या मोहिमेसाठी करण्यात आली आहे. 
- बिमला नेगी, व्यवस्थापक 

Web Title: Everest Sir to Manisha Dhurve