
महाविकास आघाडीचं उत्तम चाललयं, अशोक चव्हाणांचा फडणवीसांना टोला
नांदेड : राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज रविवारी (ता.तीन) नांदेडमध्ये एका कार्यक्रमानिमित्त एकाच व्यासपीठावर होते. मग चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळाले. महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) उत्तम चाललं आहे. तुम्ही थोडं अॅडजस्ट केलं तर आणखीन उत्तम चालेल, असा टोला चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. सध्या राज्यातील राजकीय वातावरण पाहिल्यास असे वाटते की जणू राजकीय युद्धच सुरु आहे. जर हे थांबल नाही तर गँगवार सुरु होईल, अशी शंका त्यांनी उपस्थित केली. (Everything Is Good In Mahavikas Aghadi, Ashok Chavan Said To Devendra Fadnavis In Nanded)
हेही वाचा: पाकिटमार मोदी सरकार, महागाईवरुन नाना पटोले यांची टीका
भाजप आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी राजकारणाचा स्तर घसरु देऊ नये असे आवाहन चव्हाण यांनी केले.
अशोक चव्हाणांनी पुढाकार घ्यावा
महाविकास आघाडी सरकारने राज्यातील बुलेट ट्रेनची बंद झालेली कामे सुरु करावीत. त्या करिता अशोक चव्हाण यांनी पुढाकार घेऊन मध्यस्थी करावी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. रेल्वे प्रकल्पांसाठी लागणारा ५० टक्के निधी राज्याने बंद केला आहे.
हेही वाचा: ED मुळे फायरब्रँड राज ठाकरे हे 'फ्लाॅवर' का झाले? : रूपाली ठोंबरे
अशोक चव्हाणांनी पुढाकार घेतल्यास बुलेट ट्रेन यासह इतर महत्त्वाचे रेल्वे प्रकल्प मार्गी लागतील असा विश्वार फडणवीसांनी व्यक्त केला.
Web Title: Everything Is Good In Mahavikas Aghadi Ashok Chavan Said To Devendra Fadnavis In Nanded
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..