ED च्या नोटीसीमुळे फायरब्रँड राज ठाकरे हे 'फ्लाॅवर' का झाले? : रूपाली ठोंबरे | Rupali Patil Thombare Comment On Raj Thackeray | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray And Rupali Patil Thombare

ED मुळे फायरब्रँड राज ठाकरे हे 'फ्लाॅवर' का झाले? : रूपाली ठोंबरे

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी (ता.दोन) मुंबईत शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणावर टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) नेत्या रुपाली ठोंबरे (Rupali Thombare) यांनीही ठाकरे यांच्या भाषणाचा समाचार घेतला. त्या म्हणाल्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे महाराष्ट्राचे फायरब्रँड नेते आहेत. मात्र सक्तवसूली संचालनालयाच्या (ED) नोटीसीने फायरब्रँड असणारे राज ठाकरे (Raj Thackeray) हे फ्लाॅवर का झाले? भाजपकडून जी ईडीची सूडबुद्धीने कारवाई केली, तिथे कुठेतरी फायरब्रँड नेत्याचं फ्लाॅवर झालं आहे. (Rupali Patil Thombare Criticize Raj Thackeray For His Gudhipadwa Melawa Speech)

हेही वाचा: पाकिटमार मोदी सरकार, महागाईवरुन नाना पटोले यांची टीका

राज ठाकरे यांनी मेळाव्यातील भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली. पवार व त्यांचा पक्ष जातीयवादी राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. राज ठाकरे यांच्या भाषणावर राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रमाणावर टीका-टीप्पणी होत आहे. यात रुपाली ठोंबरे यांनी उडी घेतली आहे.

हेही वाचा: राज ठाकरे सत्यच बोलले, महाविकास आघाडीने... - फडणवीस

त्या म्हणाल्या, ईडीच्या नोटीसीनंतर फायरब्रँड नेत्याच फ्लाॅवर का झालं, असा माझ्यासारख्या कार्यकर्तीला प्रश्न पडला आहे. शरद पवार हे ईडीच्या कारवाईला न जुमानता उभे राहिले. त्यांनी ती कारवाई परतावून लावली. राज ठाकरे यांनी जातीच्या कारणाला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्यास रुपाली ठोंबरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादीत अजिबात जातीयवाद नाही. कारण सगळ्या जाती, धर्माची आणि पंथाची लोक पक्षात आहेत.

Web Title: Rupali Patil Thombare Criticize Raj Thackeray For His Gudhipadwa Melawa Speech

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..