पाकिटमार मोदी सरकार, महागाईवरुन नाना पटोले यांची टीका | Nana Patole Comment On Inflation | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nana Patole

पाकिटमार मोदी सरकार, महागाईवरुन नाना पटोले यांची टीका

मुंबई : दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांचे जगणे मुश्किल झाले आहे. दररोज पेट्रोल-डिझेलचेही दरवाढ होत आहे. तसेच किराणापासून, पालेभाज्या ते सर्वच वस्तूंच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे. काँग्रेस पक्षाचे महागाई विरोधात देशभर आंदोलने चालू आहे. दुसरीकडे राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Congress Party) आणि शिवसेनेकडून आंदोलने होत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी महागाईवरुन केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे. (Nana Patole Said, Modi Government Takes Money Of Public)

हेही वाचा: राज ठाकरे यांच्या 'त्या' वक्तव्यावर इम्तियाज जलील म्हणाले, वेळ आल्यावर बोलू

पटोले आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, की एका वर्षात डिझेलचा भाव २५ रुपयांनी भडकला. आज पेट्रोल-डिझेलच्या दरात आणखी ८० पैशांच्या वाढीसह आठवाड्याभरात इंधनात ८ रुपयांची दरवाढ ! पाकिटमार मोदी सरकार, असा हल्लाबोल नाना पटोले यांनी मोदींना केला आहे.

हेही वाचा: पेट्रोल, डिझेल दरवाढ कायम

महागाई (Inflation) वाढत असताना सरकारकडून जनतेला दिलासा काही मिळताना दिसत नाही. मात्र सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. खर्चाला किती कात्री लावायची हा ही प्रश्न त्याच्या समोर उभा आहेच.

Web Title: Nana Patole Said Modi Government Takes Money Of Public

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..