महाराष्ट्रातील ८५ मेगावॅट पॉवर प्लांट इव्होनिथ स्टीलच्या ताब्यात; ऊर्जा सुरक्षिततेला बळ, प्रकल्पामुळे विस्ताराला चालना

Maharashtra Power Plant : इव्होनिथ स्टीलने वर्धा येथील इंद्रजित पॉवर कंपनीचे अधिग्रहण पूर्ण केले आहे. यामुळे महाराष्ट्रातील ऊर्जा सुरक्षिततेला आणखी बळ मिळू शकणार आहे.
Maharashtra Power Plant

Maharashtra Power Plant

ESakal

Updated on

मुंबई : इव्होनिथ स्टीलने दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता (IBC) प्रक्रियेअंतर्गत महाराष्ट्रातील वर्धा येथील इंद्रजित पॉवर प्रा. लि. (IPPL) या कंपनीचे २३२ कोटी रुपयांमध्ये यशस्वी अधिग्रहण पूर्ण केले आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने (NCLT) २० एप्रिल २०२६ रोजी इव्होनिथ स्टीलची यशस्वी ठराव अर्जदार (SRA) म्हणून निवड मंजूर केली होती. त्यानंतर कंपनीने आता अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण केली आहे. इंद्रजित पॉवर प्रा. लि. ही ८५ मेगावॅट क्षमतेची कोळसा-आधारित वीज निर्मिती कंपनी असून, इव्होनिथ स्टीलच्या विद्यमान तसेच आगामी विस्तार योजनांसाठी आवश्यक वीजपुरवठा करण्याची तिची क्षमता आहे. या अधिग्रहणामुळे कंपनीची ऊर्जा सुरक्षितता अधिक मजबूत होण्यास मदत होणार असून भविष्यातील वाढीसाठीही महत्त्वाचा आधार मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com