माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचा राजकारणातून संन्यास

येथून पुढे निवडणूक लढवणार नसल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
suresh prabhu
suresh prabhu

सिंधुदुर्ग : माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू (Suresh Prabhu) यांनी राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. कणकवली येथील कार्यक्रमामध्ये त्यांनी आपण राजकारणातून संन्यास घेत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, येथून पुढे निवडणूक (Election) लढवणार नसल्याचे सांगत पर्यावरणासाठी काम करणार असल्याचे प्रभू यांनी जाहीर केले आहे. (Ex Cabinet Minister Suresh Prabh Announced Retirement from Politics )

suresh prabhu
सिंधुदुर्ग पर्यटनाचा आराखडा तयार - सुरेश प्रभू 

प्रभू म्हणाले की, 2014 मध्ये लोकसभा निवडणूक (Loksabha Election) लढविली नव्हती, तशीच यापुढेही निवडणूक लढविणार नसल्याचे सांगत ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून हवामानात (Change In Environment) मोठे बदल होते आहेत, त्यासाठी हा प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राजकारणात प्रवेश केल्यानंतर शिवसेनेच्या (Shiv sena) माध्यमातून सिंधुदुर्गात विकासाची पायाभरणी केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. राजकारण विरहीत प्रश्न सोडवायचे आहेत, त्यामुळेच निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रभूंनी स्पष्ट केले.

suresh prabhu
पवारांनी राज्य सरकारला सुधरा असा सल्ला दिलाय - फडणवीस

प्रभू यांनी लोकसभेसाठी राजापूर मतदार संघातून त्यांनी सलग चारवेळा प्रतिनिधित्व केले होते. येथून पुढे आपण निवडणूक लढवणार नसून पर्यावरणासाठी काम करणार असल्याचे प्रभू यांनी जाहीर केले आहे. गेल्या काही दिवसांपासून पर्यावरणासंबंधी मोठे बदल होत आहेत त्यामुळे पर्यावरणाशी संबंधित अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी यापुढील आयुष्य खर्ची करणार असल्याचे प्रभू यांनी म्हटले आहे. राजकारणाच्या पलिकडे जाऊन हे सर्व प्रश्न आपल्याला सोडवायचे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे यापुढे कुठल्याही प्रकारची निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट घोषणा त्यांनी यावेळी केली आहे.

suresh prabhu
फ्रान्समध्ये अडकला होता पुण्यातील तरुण; सुरेश प्रभू यांनी उचलले `हे` पाऊल

जुन्या आठवणीला दिला उजाळा

कार्यक्रमात बोलतान प्रभू यांनी एका जुन्या आठवणीला देकील उजाळा दिला. ते म्हणाले की, जेव्हा सीएचा व्यवसाय चांगला चालत असताना मी जेव्हा राजकारणात येण्याचा निर्णय घेतला त्यावेळी, आपल्या या निर्णयाला घरातल्यांनी विरोध केला. परतु, शिवसेना पक्ष प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे आपण राजकारणात आलो आणि खासदार झाल्याची आठवण प्रभू यांनी यावेळी सांगितली.

सीेए ते केंद्रीय मंत्री पदापर्यंतचा प्रवास

  • सुरेश प्रभू यांनी मोदी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळात रेल्वे, वाणिज्य खाते संभाळले होते.

  • प्रभू पेशाने चार्टर्ड अकाउंटंट असून, ते भाजपमध्ये येण्यापूर्वी शिवसेनेचे नेते होते.

  • प्रभू यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळातही मंत्री होते. यात त्यांनी नद्या जोड प्रकल्पासाठी उल्लेखनीय काम केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com