विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीसांची सरकारवर टीका; म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा असल्या तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा नामोल्लेख सुद्धा असू नये, हे दुर्दैवी आहे, असल्याची टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

मुंबई : महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा असल्या तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा नामोल्लेख सुद्धा असू नये, हे दुर्दैवी आहे, असल्याची टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

नवे सरकार मराठवाडा आणि विदर्भाकडे लक्ष देईल अशी अपेक्षाही त्यांनी नवीन सरकारकडे व्यक्त केली आहे. राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर आज (ता. २८) महाविकास आघाडीचे नेते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री म्हणून शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीला अनेक दिग्गजांनी उपस्थिती होती. महाराष्ट्र विकास आघाडीच्या सहा नेत्यांनीही यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

भाजपला दणका; पोटिनिवडणुकीत तीनही जागांवर पराभव

मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आटोपल्यानंतर सह्याद्री अतिथी गृहावर मंत्रिमंडळाची बैठक होत असून या बैठकीत काय निर्णय होणार या कडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच, माजी मुख्यमंत्री आणि नियोजित विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या किमान समान कार्यक्रात विदर्भ आणि मराठवाडा या दोन विभागांना दुर्लक्ष केले असल्याची टीका केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ex CM devendra Fadanvis criticise on Maharashtra vikas Aghadi Government