Sushilkumar Shinde: प्रणिती शिंदे अन्‌ मला भाजपची ऑफर! माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेचा गौप्यस्फोट; चंद्रकांत पाटील आज घेणार भेट

खासदारकीला दोनदा पराभव झाला, तरी मला आणि आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपमध्ये या म्हणून ऑफर आल्याचा गौप्यस्फोट माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला. आपण पक्ष सोडणार नाही’ असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
Sushilkumar Shinde praniti shinde bjp offer
Sushilkumar Shinde praniti shinde bjp offeresakal

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून खासदारकीला दोनदा पराभव झाला, तरीदेखील मला आणि आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपमध्ये या म्हणून ऑफर आल्याचा गौप्यस्फोट माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला. ’आता मी ८३ वर्षात आहे, अशावेळी दुसऱ्याचे घर कसे उभा करणार म्हणत त्यांनी आपण पक्ष सोडणार नाही’ असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सोलापुरातील एका हुर्डा पार्टीनिमित्त आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात श्री. शिंदे यांनी भाषण केले. त्यावेळी त्यांनी भाजपकडून आपल्याला व मुलगी प्रणिती शिंदेंना ऑफर आल्याचे स्पष्ट केले. ‘ज्या आईच्या कुशीत आमचे बालपण, तारूण्य गेले, अशावेळी आम्ही दुसरीकडे जाणे कसे शक्य आहे’, असा सवालही त्यांनी यावेळी केला. आमदार प्रणिती शिंदे तर कधीही पक्ष बदलण्याचा विचार करणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राजकारणात असे होत राहते, दिवंगत पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्याही बाबतीत असे झाले होते. पण, त्यांनी पक्ष सोडला नाही. सध्या पक्षाला थोडेसे वाईट दिवस आहेत, पण यातूनही पक्ष निश्चितपणे उभारी घेईल. थोडा त्रास होतो, पण त्यातही संघर्ष करून उभा राहिल्यास निश्चितपणे पुन्हा यश मिळते असेही ते म्हणाले.

श्री. शिंदेंनी सांगितला, नेहरूंच्या भाषणाचा किस्सा

सोलापुरातील गड्डा मैदानावर दिवगंत पंतप्रधान पंडीत नेहरूंनी भाषण केले होते, तेव्हा मी लहान होतो. त्यावेळी ते म्हणाले, ‘मुलगा जन्मल्यावर लहानपणी तो कोणाचा तरी आधार घेऊन चालण्याचा, उभारण्याचा प्रयत्न करतो. काही दिवसांनी तो स्वत: चालण्याचा किंवा उभारण्याचा प्रयत्न करतो आणि पडतो. पण, ज्यावेळी तो उभारतो त्यावेळी तो पुन्हा कधीच पडत नाही’. सध्या पक्षाला थोडे वाईट दिवस आहेत, पण कालांतराने पक्ष पुन्हा उभारी घेईल, असा विश्वासही श्री. शिंदे यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला.

चंद्रकांत पाटील श्री. शिंदेंची घेणार भेट

सोलापूर शहरातील नॉर्थकोट मैदानावर १००वे नाट्यसंम्मेलन होणार आहे. त्यानिमित्ताने निमंत्रण देण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची त्यांच्या जनवात्सल्य या निवासस्थानी भेट घेणार आहेत. राजकीय चर्चा होणार नसून नाट्यसंम्मेलनाच्या निमंत्रणासाठी भेट असल्याचे सांगितले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com