"पेपरफुटीची प्रकरणं आढळल्यास शाळांची मान्यता काढणार" | Varsha Gaikwad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Varsha Gaikwad

"पेपरफुटीची प्रकरणं आढळल्यास शाळांची मान्यता काढणार"

सध्या राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत. कोरोनानंतर दोन वर्षांनंतर परीक्षा ऑफलाइन होत आहेत. अशात अनेक ठिकाणी राज्यात परीक्षा सुरु असताना गैरप्रकार आढळले. कोरोनामुळे सध्या शाळा तिथे केंद्र सुरु केले आहे त्यामुळे कॉपीचे प्रकरणात वाढ झाल्याचे आढळून येत आहेत. या संदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड महत्वाची घोषणा केली आहे.

परीक्षेदरम्यान पेपरफुटीची प्रकरणं आढळल्यास त्या शाळांची मान्यता काढून घेतली जाणार, असे स्पष्ट निर्देश वर्षा गायकवाड यांनी दिले. सोबत कॉपीचे प्रकरणे आढळल्यास यानंतर त्या शाळांना परीक्षा केंद्र दिलं जाणार नाही, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. त्या विधानपरिषदेत बोलत होत्या.

हेही वाचा: झेडपीच्या 43 शाळांना लागणार टाळे? कोरोनामुळे ढासळली 'प्राथमिक' गुणवत्ता

अहमदनगर आणि औरंगाबादमध्ये पेपरफुटीचं प्रकरण आढळून आले होते. यावर बोलताना या शाळांची मान्यता काढून घेण्यात आल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. यंदा शाळा तिथे केंद्र असल्याने दहावीची केंद्र मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जास्त पोलीस बंदोबस्ताची मागणी आम्ही केली असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले

Web Title: Exam Centre Will Be Closed If Cheating Found There Varsha Gaikwad Declared

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top