विद्यार्थ्यांची त्यांच्याच महाविद्यालयात परीक्षा! सोमवारपासून BA, B-com, B-sc, BBA, BCAची परीक्षा; ‘अभियांत्रिकी’ची डिसेंबरपासून परीक्षा

प्रथम वर्षातील बीए, बीकॉम, बीएस्सी, बीसीए व बीबीएच्या विद्यार्थ्यांची परीक्षा त्यांच्याच महाविद्यालयात होणार आहे. हॉल तिकिटावर तांत्रिक कारणास्तव केंद्र दुसरे येवू शकते, पण प्रथम वर्षातील सर्वच विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र त्यांचेच महाविद्यालय असणार आहे.
HSC Exam
HSC Examesakal

सोलापूर : प्रथम वर्षातील बीए, बीकॉम, बीएस्सी, बीसीए व बीबीए या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आता त्यांच्याच महाविद्यालयात होणार आहे. हॉल तिकिटावर तांत्रिक कारणास्तव परीक्षा केंद्र दुसरे येवू शकते, पण प्रथम वर्षातील सर्वच विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र त्यांचेच महाविद्यालय असणार आहे. तसे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील परीक्षा विभागाने स्पष्ट केले आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पारंपारिक अभ्यासक्रमाची परीक्षा सोमवारपासून (ता. २०) सुरु होत आहे. प्रथम व तृतीय सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांचा पहिला पेपर असणार आहे. त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या सेमिस्टरची परीक्षा सुरु होईल.

परीक्षांचा निकाल वेळेत जाहीर व्हावा, या हेतूने विद्यापीठाने यंदापासून प्रथम वर्षाच्या परीक्षेची जबाबदारी संलग्नित महाविद्यालयांवर सोपविली आहे. त्या महाविद्यालयांनी त्यांच्याकडील प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा त्यांच्याच महाविद्यालयात घ्यायची आहे. त्यासाठी त्याच महाविद्यालयातील परीक्षक असतील. पण, दुसऱ्या महाविद्यालयातील एक बाह्य परीक्षक प्रत्येक परीक्षा केंद्रावर वॉच ठेवणार आहे.

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु होणार आहे. त्या परीक्षेचे वेळापत्रक पुढील आठवड्यात फायनल होणार आहे. परीक्षेनंतर उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन ऑफलाईनच होणार आहे.

परीक्षेसाठी ३५ केंद्रे अन् तीन भरारी पथके

पहिल्या वर्षाची परीक्षा विद्यापीठाशी संलग्नित १०९ महाविद्यालयातच होणार आहे. पण, इतर वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ३५ परीक्षा केंद्रे असणार आहेत. पारंपारिक अभ्यासक्रमाचे अंदाजे ३५ हजार विद्यार्थी तर व्यावसायिक अभ्यासक्रम व पदव्युत्तर पदवीचे एकूण १८ हजार विद्यार्थी आहेत. त्या सर्वांच्या परीक्षांवर वॉच ठेवण्यासाठी विद्यापीठाने तीन भरारी पथके नेमली आहेत.

कॉपी करताना आढळल्यास ठोस कारवाई

परीक्षा देताना कॉपी करून पेपर लिहिताना आढळलेल्या विद्यार्थ्यावर ठोस कारवाई केली जाणार आहे. अशा विद्यार्थ्यांना परीक्षा प्रमाद समितीकडे (लॅपसेस कमिटी) पाठविले जाते. त्या विद्यार्थ्यांकडे सापडलेली कॉपी, त्याचे प्रमाण व त्यातील किती उत्तर कॉपीत पाहून लिहिले, याची पडताळणी केली जाते. त्यानुसार त्या विद्यार्थ्याला आर्थिक दंड किंवा तेवढा एक पेपर अथवा चालू सेमिस्टरच्या सर्व विषयांत पुन्हा उत्तीर्ण व्हावे, अशी शिक्षा होवू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेत कॉपी करू नये, असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com