मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान सोहळा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल राज्य शासनामार्फत दिला जाणारा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार, पत्रकार सुधाकर डोईफोडे अग्रलेखन पुरस्कार यांच्यासह विविध पत्रकारिता पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत आज (ता. २७) जुलै रोजी होणाऱ्या समारंभात प्रदान केले जाणार आहेत.

मुंबई : पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल राज्य शासनामार्फत दिला जाणारा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार, पत्रकार सुधाकर डोईफोडे अग्रलेखन पुरस्कार यांच्यासह विविध पत्रकारिता पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत आज (ता. २७) जुलै रोजी होणाऱ्या समारंभात प्रदान केले जाणार आहेत.

सन २०१६, २०१७ आणि २०१८  साठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार अनुक्रमे दैनिक हितवादचे संपादक विजय फणशीकर, ज्येष्ठ पत्रकार रमेश पतंगे, ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना प्रदान करण्यात येणार आहे. प्रत्येकी एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. याशिवाय राज्यस्तरीय आणि विभागस्तरीय पत्रकारिता, छायाचित्रकार, दूरचित्रवाणी वाहिनीवरील वृत्तकथा आदी पुरस्कार या समारंभात प्रदान होतील.

यावेळी महाराष्ट्र माझा शेतकरी राजा लघुचित्रपट स्पर्धा २०१६ आणि महाराष्ट्र माझा छायाचित्र स्पर्धा २०१७ आणि २०१८ मधील विजेत्यांनाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान होणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Excellency Journalism award ceremony tomorrow in presence of CM Devendra fadanvis