esakal | माजी मुख्यमंत्र्यांमुळे विस्तार रखडला
sakal

बोलून बातमी शोधा

Prithviraj-and-Ashok

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश करावा किंवा त्यांना सल्लागार म्हणून ठेवावे याचा निर्णय काँग्रेस हायकमांडकडून होत नसल्याचे राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

माजी मुख्यमंत्र्यांमुळे विस्तार रखडला

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश करावा किंवा त्यांना सल्लागार म्हणून ठेवावे याचा निर्णय काँग्रेस हायकमांडकडून होत नसल्याचे राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांचा विजय झाला होता. राज्यातील सत्तास्थापनेच्या घडामोडीत भाजपला विरोधी पक्षात बसावे लागल्यानंतर फडणवीस यांच्याकडे भाजपने विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपवली. महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेच्या मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र मंत्रिमंडळाच्या संपूर्ण विस्ताराला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. विस्तारासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची यादी तयार आहे.

कौतुकास्पद ! फायरमनच्या धाडसामुळे 11 जणांना मिळाले जीवदान

परंतु, काँग्रेसची खलबते दिल्लीत सुरू आहेत. अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी एकेकाळी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी पार पाडल्याने त्यांना एखाद्या खात्याचे मंत्री करणे योग्य दिसणार नाही, असा मोठा मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे. त्यापेक्षा या दोघांनी अनुभवाच्या जोरावर महाविकास आघाडी सरकारचे सल्लागार म्हणून जबाबदारी स्वीकारावी, असा मानणारा वर्ग काँग्रेसमध्ये आहे. काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांचेही हेच मत असल्याचे काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने सांगितले. परंतु, या दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांना मात्र मंत्री होण्याची इच्छा असल्याची चर्चा आहे.

काँग्रेस पक्ष फरपटत जाऊ नये, यासाठी मंत्रिमंडळात ज्येष्ठ नेते  असावेत.
- अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री