esakal | आयटीआय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ 
sakal

बोलून बातमी शोधा

Extending the ITI Online Admission Process

आयटीआय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक - शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल 30 ऑगस्टला घोषित करण्यात आला असून यात उत्तीर्ण विद्यार्थी, यापूर्वी अर्ज न भरू शकणारे विद्यार्थी तसेच या पूर्वी प्रवेश अर्ज भरल्यानंतरही प्रवेश मिळालेले नाहीत असे विद्यार्थी पुन्हा ऑनलाइन अर्ज भरू शकता. 

जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावरील आयटीआयमध्ये तसेच सातपुर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आणि त्र्यंबकनाका औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) येथे प्रवेश दिले जाणार आहे. 

सर्व आयटीआय मध्ये अर्ज स्वीकृति केंद्र असून या केंद्रावर विद्यार्थी माहिती प्राप्त करू शकतील. तसेच ऑनलाइन अर्ज भरणे, पडताळणी, स्वीकृति व निश्‍चिती करू शकतील. माध्यमिक शाळेत व्यवसाय शिक्षण हा विषय घेऊन दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे. 

विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर भरावा. 

आयटीआय प्रवेश वेळापत्रक 

ऑनलाइन अर्ज भरणे, आयटीआय मध्ये जमा करणे : 4 ते 11 सप्टेबर 

गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्धी : दि. 12 सप्टेबर 

संस्थास्तरावर गुणवत्ता यादी प्रसिद्धी दि. 13 सप्टेबर 

संस्थास्तरावरील प्रवेश प्रक्रिया दि. 14 सप्टेबर 

प्रवेश अर्ज शुल्क 

खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी: 150 रुपये 

राखीव प्रवर्गातील विद्यार्थी: 100 रुपये 

राज्याबाहेरील विद्यार्थी: 300 रुपये 

अनिवासी भारतीय विद्यार्थी: 500 रुपये 

विद्यार्थ्यांनी ऑनलाइन फॉर्म भरुन त्याची प्रत जवळच्या आयटीआय मध्ये जावून आपला प्रवेश निश्‍चित करावा. शासकीय आयटीआय त्र्यंबकनाका येथे फक्त मुली/महिलांसाठीच प्रवेश देण्यात येणार असून प्रवेशासाठी वयाची अट नाही. 
- एम. डी. भामरे, प्राचार्या, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), त्र्यंबकनाका, नाशिक. 

loading image
go to top