जातवैधता प्रमाणपत्रासाठी तीन जुलैपर्यंत मुदतवाढ 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

नाशिक : एमबीबीएस, बीडीएससह अन्य विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी उद्या (ता. 17) अंतिम मुदत आहे. कागदपत्र पडताळणीकरिता विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याची पावती दाखविता येईल. प्रमाणपत्र तीन जुलैपर्यंत सादर करण्याची मुभा आहे. पहिली निवड यादी दोनऐवजी चार जुलैला जाहीर होणार आहे. 

नाशिक : एमबीबीएस, बीडीएससह अन्य विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी उद्या (ता. 17) अंतिम मुदत आहे. कागदपत्र पडताळणीकरिता विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याची पावती दाखविता येईल. प्रमाणपत्र तीन जुलैपर्यंत सादर करण्याची मुभा आहे. पहिली निवड यादी दोनऐवजी चार जुलैला जाहीर होणार आहे. 

"नीट' परीक्षेतील गुणांच्या आधारावर ऑल इंडिया कोटा, विभागीय कोट्यासह आरक्षणाच्या जागांसाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविले होते. अर्ज भरल्यानंतर चलनाद्वारे शुल्क भरण्याची मुदत सोमवारपर्यंत (ता. 18) असेल. कागदपत्र पडताळणी प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांकडे जात प्रमाणपत्र नसले तरी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विभागाकडे सादर केलेल्या प्रस्तावाची पावती जोडता येईल. विद्यार्थ्यांनी विभागाशी संपर्कात राहून प्रमाणपत्र मिळवायचे आहे. राज्यातील आठ कागदपत्र पडताळणी केंद्रांवर दोन व तीन जुलैला सकाळी दहा ते सायंकाळी पाचदरम्यान जातवैधता प्रमाणपत्र सादर करायचे आहे. प्रमाणपत्र सादर करू न शकलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज खुल्या गटासाठी पात्र धरले जातील व त्यांना आरक्षणाचा लाभ घेता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. 
 
अशी आहेत कागदपत्र पडताळणी केंद्रे 
- ग्रॅंट गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेज, भायखळा 
- आर. ए. पोद्दार आयुर्वेदिक कॉलेज, वरळी 
- बी. जे. गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेज, पुणे 
- गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेज, नागपूर 
- गव्हर्न्मेंट आयुर्वेदिक कॉलेज, नागपूर 
- गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेज, औरंगाबाद 
- गव्हर्न्मेंट आयुर्वेदिक कॉलेज, नांदेड 
- गव्हर्न्मेंट आयुर्वेदिक कॉलेज, उस्मानाबाद 

महत्त्वाच्या तारखा 
ऑनलाइन नोंदणीची मुदत ------------------- 17 जूनपर्यंत 
एसबीआयद्वारे चलना भरणे ------------------- 18 जून 
प्रारूप गुणवत्ता यादी जाहीर होणार ------------ 19 जून सायं. 5 
कागदपत्र पडताळणीची मुदत ---------------- 21 ते 25 जून 
सुधारित प्रारूप गुणवत्ता यादी जाहीर होणार ----- 26 जून 
ऑनलाइन प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया -------- 26 ते 29 जून 
पहिली निवड यादी जाहीर होणार --------------- 4 जुलै 

Web Title: Extension till July 3 for the caste validity certificate