Ayodhya Verdict : निकालामुळे व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकचे अनेक ग्रुप्स, पेज ब्लॉक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

बुलडाणा : सध्याचे वातावरण आणि अयोध्या निकाल पाहता सोशल मीडियावरील व्हॉट्सअ‍ॅप्स आणि फेसबुक पेज अ‍ॅडमिनने त्यांच्या ग्रुपवर निर्बंध आणत ब्लॉक करण्याचे धोरण स्वीकारले आहे. निकाल आज घोषित होणार असल्याचे संकेत मिळताच या मोहिमेला गती आली आहे. 

बुलडाणा : सध्याचे वातावरण आणि अयोध्या निकाल पाहता सोशल मीडियावरील व्हॉट्सअ‍ॅप्स आणि फेसबुक पेज अ‍ॅडमिनने त्यांच्या ग्रुपवर निर्बंध आणत ब्लॉक करण्याचे धोरण स्वीकारले आहे. निकाल आज घोषित होणार असल्याचे संकेत मिळताच या मोहिमेला गती आली आहे. 

सोशल मीडियाचा देशभरात असलेले जाळे पाहता उद्या (ता. 8) सकाळी लागणारा महत्त्वपूर्ण अयोध्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. ठिकठिकाणी सुरक्षेतेसोबत सोशल मिडीयावर काय करावे आणि काय करू नये याबाबत माहिती तसेच नोटीसही देण्यात येत आहे. यामुळे सोशल मीडियावरील महत्त्वपूर्ण प्लॅटफॉर्म असलेल्या व्हॉट्सअ‍ॅप्स गु्रप तसेच फेसबुक पेजच्या अ‍ॅडमिनने सर्वांसाठी मेसेज टाकण्याची मुभा आता ब्लॉक केली आहे.

यामुळे आलेला मेसेज ब्लॉक असलेल्या ग्रुपवर शेअर करण्याला आता पायबंद झाला आहे. पोलिसांनी यापूर्वीच विविध व्हॉट्सअ‍ॅप्स गु्रपच्या अ‍ॅडमिनला नोटीस देऊन आक्षेपार्ह चित्र, व्हिडिओ किंवा इतर मजकूर इतरत्र ग्रुपवर प्रसारित केल्या जाणार नाही. याबाबत खबरदारी घेण्याच्या नोटीस दिल्या आहे. दरम्यान, संध्याकाळपासून केवळ ग्रुप अ‍ॅडमिनलाच मेसेज टाकण्याची मुभा अवलंबित इतरांना ती ब्लॉक करण्याची मोहिम सुरू केली आहे. आतापर्यंत सोशल मीडियावरील हा बहुधा पहिला प्रयोग असावा असे यातील तज्ज्ञ मत व्यक्त करत आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात कोणीही कुठलाही मजकूर टाकू नये अशा सूचना आणि त्यांचे नियमही सातत्याने शेअरींग करण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: facebook and whatsapp groups and pages getting blocked due to ayodhya verdict