मजुरांअभावी कारखान्यांचे गाळप बंद ; बळिराजा चिंतेत

Factory collapses due to laborers problems
Factory collapses due to laborers problems

सोलापूर : यंदा गाळप परवान्यासाठी राज्यातील 194 साखर कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले परंतु, त्यापैकी 105 कारखान्यांनाच परवाना देण्यात आला आहे. दुसरीकडे मजुरांअभावी कारखान्यांना क्षमतेनुसार ऊस उपलब्ध होत नसल्याने त्यापैकी फक्‍त 46 कारखान्यांचेच गाळप सुरू असल्याचे साखर आयुक्‍तालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आता "दुष्काळात तेरावा महिना' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

गाळप हंगाम 20 ऑक्‍टोबरपासून सुरू होऊनही परवाना वेळेवर न मिळाल्याने आतापर्यंत फक्‍त 12 लाख 80 हजार मे. टन उसाचे गाळप झाले आहे. आता पाण्याअभावी बहुतांशी क्षेत्रावरील ऊस जागेवरच करपून जात आहे. राज्यात दुष्काळाची दाहकता वाढत असून दिवसेंदिवस पाणीटंचाई तीव्र होत आहे. दुसरीकडे हुमणी बाधित ऊस नेण्याला प्राधान्य द्यावे, अशा साखर आयुक्‍तांनी सूचना केल्या. परंतु, कारखानेच बंद असल्याने तो ऊस पूर्णपणे वाया गेला आहे.

एफआरपीच्या प्रश्‍नावरून कोल्हापूर जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांनी गाळप बंद केले आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत बळिराजापुढे संकट निर्माण झाले आहे. परवाना नसतानाही गाळप केल्याप्रकरणी जिल्ह्यातील संत दामाजी कारखान्याला नोटीस बजावण्यात आली आहे. 

आयुक्‍तांची भूमिका रास्त : टायमिंग चुकीचे 

एफआरपी दिल्याशिवाय गाळप परवाना मिळणार नाही, अशी साखर आयुक्‍तांची भूमिका रास्त होती. परंतु, टायमिंग चुकीचे होते. राज्यात उसावर हुमणीचा प्रादुर्भाव अन्‌ दुसरीकडे पाण्याअभावी ऊस करपत होता. तसेच दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर मजुरांचा तुटवडा भासणार, याची जाणीव असतानाही आयुक्‍तांनी कधी नव्हे तेवढी ताठर भूमिका आताच का घेतली, असा प्रश्‍न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. 

गाळपाची सद्यस्थिती... 

गाळप परवान्यासाठी अर्ज 
194 साखर कारखाने 

परवाना मिळाला 
105 कारखाने 

गाळप सुरू असलेले 
46 कारखाने 

आतापर्यंतचे गाळप 
12.80 लाख मे.टन 

यंदाचे अपेक्षित गाळप 
821 लाख मे.टन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com