esakal | वीजबिलांच्या थकबाकीवरुन फडणवीसांचा सरकारवर आरोप; म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

fadnvis

वीजबिलांच्या थकबाकीवरुन फडणवीसांचा सरकारवर आरोप; म्हणाले...

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : राज्यातील ६३ हजार कोटी रुपयांच्या वीजबील थकबाकीला मागील भाजप सरकार कारणीभूत असल्याचा आरोप मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. या आरोपांना उत्तर देताना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवरच आरोप केला आहे. शेतकऱ्याकंडून वीजबीलं जबरदस्तीनं वसूल करण्यासाठी हा सगळा बाऊ केला जात असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: मुलांच्या सार्वत्रिक लसीकरणाची अद्यापही शिफारस नाही - नीती आयोग

फडणवीस म्हणाले, "वीजबिलांची जी काही थकबाकी आपण दाखवतो. यामध्ये विशेषतः कृषी पंपांसंदर्भात आपण क्रॉस सबसिडी करतो. त्यानंतर जो काही आपले तोटा असतो तो भरुन काढण्यासाठी आपल्याला जे भाडं मिळलं, त्यातून तो आपण भरुन काढतो. त्यामुळे मला असं वाटतं की, जबरदस्तीनं वसूली करण्याकरता हा सगळा बाऊ केला जातोय. एकीकडे शेतकरी आणि सामान्य नागरिक अडचणीत आहे आणि तो अडचणीत असताना त्याला मदत करण्याऐवजी सरकारला त्यांच्याकडून जबरदस्तीनं वसूली करायची आहे, यासाठीच हे सर्व नाटक सुरु आहे"

थकबाकीवरुन काय म्हणाले होते जयंत पाटील?

"वीजबील थकबाकीचा मोठा डोंगर सध्या राज्याच्या डोक्यावर उभा आहे. ही जवळपास ७३ हजार कोटींची थकबाकी आहे. यातून मार्ग काढण्याचे सध्या प्रयत्न सुरु आहेत. भाजपच्या काळात थकबाकी वाढली आणि त्यांनी त्यावर काहीच केलं नाही. मधल्या काळात आमच्या सरकारने ज्या योजना आणल्या त्यातून लोकांना १० हजार कोटींची सवलत मिळाली. ही थकबाकीची रक्कम कमी केली तरी सध्या ६३ हजार कोटी रुपयांची थकबाकी राज्याच्या डोक्यावर आहे. पण या थकबाकीला २०१४ साली आलेलं सरकार कारणीभूत आहे," असा आरोप जयंत पाटील यांनी केला होता.

loading image
go to top