
Created By : Vishvas Fact check
Translated By : Sakal Digital Team
मुंबई: अझरबैजानच्या बाकूहून रशियाला जाणारे एक प्रवासी विमान कझाकस्तानच्या अकताऊ शहराजवळ काही दिवसांपूर्वी कोसळले होते. या अपघातात 38 जणांचा मृत्यू झाला. 29 जणांना वाचवण्यात यश आले. आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ क्लिप शेअर केली जात आहे ज्यात दावा केला जात आहे की दिल्लीहून मुंबईला जाणारे विमान देखील क्रॅश झाले आहे.