शेतकऱ्यांभोवती पाश

शेतकऱ्यांभोवती पाश

पुणे - शेतकऱ्यांना पतपुरवठा करण्यासाठी राज्यात सहकारी संस्थांचे भक्‍कम जाळे असल्याचे सांगितले जाते; परंतु परवानाधारक सावकारांकडून जादा व्याजदराने बाराशे कोटी रुपयांहून अधिक कर्ज घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढवली आहे. तसेच काही परवानाधारक सावकार जादा दराने व्याज वसूल करीत असून, यासंदर्भात सहकार आयुक्‍तांनी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. 

शेतकऱ्यांना विविध कार्यकारी सेवा सोसायटी, जिल्हा बॅंक आणि राज्य सहकारी बॅंकांकडून पतपुरवठा केला जातो; परंतु त्यांच्याकडून शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळत नाही. तसेच, कागदपत्रांच्या क्‍लिष्ट पद्धतीमुळे शेतकरी सावकारांच्या पाशात अडकत चालला आहे. शेतकऱ्यांना होणाऱ्या एकूण पतपुरवठ्याच्या तुलनेत ६० टक्‍के कर्ज वितरण हे खासगी आणि परवानाधारक सावकारांकडून होत आहे. अनेक शेतकरी तारण म्हणून स्थावर मालमत्ता, शेतजमीन गहाण ठेवतात. काही सावकार जादा व्याजदर आकारत असल्याच्या तक्रारी येत असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

परवानाधारक सावकारांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच व्यवसाय करणे अपेक्षित आहे. काही जण जादा व्याजदर आकारणी करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा सावकारांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे.  
- वरिष्ठ अधिकारी, सहकार आयुक्‍त कार्यालय

शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्‍त करण्यासाठी सुलभ पद्धतीने वेळेवर आणि हवा तेवढा कर्जपुरवठा करणे गरजेचे आहे. सेवा सोसायट्या, जिल्हा बॅंक आणि राज्य सहकारी बॅंकेच्या या त्रिस्तरीय रचनेतील त्रुटींचा अभ्यास करून नवीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल. जेणेकरून शेतकरी सावकाराकडे जाणार नाहीत. 
- विद्याधर अनास्कर, प्रशासक, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com