शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या गाडीला अपघात, 2 जण गंभीर जखमी | car accident | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ravikant tupkar

शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या गाडीला अपघात, 2 जण गंभीर जखमी

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

बुलडाणा : सोयाबीन-कापुसप्रश्नी मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीला जात असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या (Ravikant Tupkar car Accident) गाडीला अपघात झाला आहे. रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्या गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोन युवक गंभीर जखमी (two injured seriously) झाले आहेत. ही घटना बेराळा फाट्याजवळ घडली

शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या गाडीला अपघात

रविकांत तुपकर आपल्या सहकाऱ्यांसोबत मुंबईच्या दिशेने निघाले होते. बेराळा फाट्याजवळ (Berala phata) भरधाव जात असलेल्या त्यांच्या वाहनासमोर रस्ता क्रॉस करताना दुचाकी घेऊन अचानक दोन युवक आले. (Ravikant Tupkar car hits bike rider at Berala phata near Chikhali)भरधाव वेगाने रस्ता ओलांडताना दुचाकी रविकांत तुपकरांच्या गाडीला धडकल्याने हा अपघात झाला. सोमवारच्या रात्री ही घटना घडली. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले आहेत. तर, रविकांत तुपकर हे सुखरुप आहेत. अपघातात जखमी झालेल्या दोन्ही जखमींना घेऊन रविकांत तुपकर औरंगाबादकडे रवाना झाले

हेही वाचा: धक्कादायक! शरद पवारांच्या निष्ठावंत आमदाराचा एका मताने पराभव

दोन्ही युवकांना गंभीर मार

दुचाकीचा वेग खूप जास्त असल्याने मोटर सायकल नियंत्रित करण्यात चालकांना अपयश आले. परिणामी दोन्ही वाहनाची जबर धडक झाल्याने दुचाकीवर बसलेल्या दोन्ही युवकांना गंभीर मार लागला. रविकांत तुपकर यांच्या वाहनाचा वेगही अधिक होता घटनेनंतर लगेच जखमी युवकांना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र दोन्ही युवकांना गंभीर मार लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे रेफर करण्यात आले आहे.

loading image
go to top