शेतकरी व जनता सुखी होऊ दे! - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

वारकरी दांपत्याचा सत्कार
मानाचा वारकरी ठरलेले सुनील ओमासे (रा. बेडग, जि. सांगली) हे शेतकरी कुटुंबातील आहेत. विठ्ठलाची चांदीची मूर्ती, शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. एक वर्षाचा मोफत एसटी प्रवासाचा पासही देण्यात आला. दरम्यान, कार्तिकी एकादशीची चंद्रभागेतील स्नानाची पर्वणी साधण्यासाठी नदी तिरावर पहाटे चारपासून गर्दी केली होती. दर्शनासाठी आज अठरा तास लागत होते.

पंढरपूर - ‘राज्यातील शेतकरी आणि सामान्य जनता सुखी होऊ दे,’’ असे साकडे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी शुक्रवारी घातले. निर्मल वारीनंतर आता पुढील वारी धूरमुक्त वारी करण्यासाठी शासन प्रयत्नशील राहणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्‍मिणीची शासकीय महापूजा पाटील यांच्या हस्ते झाली. त्यानंतर संत तुकाराम भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमात वारकरी प्रतिनिधी म्हणून पूजेस उपस्थित राहण्याचा मान मिळालेले सुनील महादेव ओमासे आणि त्यांच्या पत्नी नंदा ओमासे यांचा सत्कार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. पाटील म्हणाले, ‘‘या वर्षी राज्यासमोर अनेक आव्हाने आली. सुरवातीला दुष्काळी स्थिती होती. त्यानंतर महापूर आणि आता अतिपावसामुळे शेतीचे नुकसान झाले. या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने उपाययोजना केल्या आहेत. केंद्राकडेही मदत मागितली आहे. पुढील वर्षी धूरमुक्त वारी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असणार आहे.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer People happy vittal rukmini chandrakant patil