वाड्यात (जिल्हा पालघर) कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

बांगर  यांची  पाच  ते सहा  एकर  जमीन  असून  त्यांनी  शेतीसाठी  शेतकरी सेवा सहकारी सोसायटीकडून ८० हजार रुपयांचे कर्ज काही  वर्षापूवीॅ  घेतले  असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून मिळाली आहे. सततची नापिकी  आणि  कर्जाचा वाढता  डोंगर यातून  नैराश्यातून त्यांनी  आत्महत्या केली

वाडा - राज्य सरकाने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले असल्याचे जाहीर केले आहे.मात्र त्यास अनेक निकष व जाचक अटी लागू असल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा जसाच्या तसा आहे, प्रत्यक्ष कर्जमाफीसाठी अजून किती कळ सोसावी याच विवंचनेत असलेल्या वाड्यातील शेतकऱ्याने अखेर आत्महत्येचा मार्ग पत्करला आहे. यामुळे  पालघर  जिल्हय़ातील  शेतकरीही  कर्जबाजारीपणामुळे  मृत्यूला  कवटाळू लागले आहेत.

मिळालेल्या  माहितीवरून, तालुक्यातील परळी येथील शेतकरी तुकाराम रामू बांगर(४२वय) यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना तात्काळ वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ठाणे येथील सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले होते. तीन दिवस मृत्यूशी झुंज देत असतांनाच उपचारा दरम्यान त्यांचा शनिवारी रात्री  मृत्यू झाला.

बांगर  यांची  पाच  ते सहा  एकर  जमीन  असून  त्यांनी  शेतीसाठी  शेतकरी सेवा सहकारी सोसायटीकडून ८० हजार रुपयांचे कर्ज काही  वर्षापूवीॅ  घेतले  असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून मिळाली आहे. सततची नापिकी  आणि  कर्जाचा वाढता  डोंगर यातून  नैराश्यातून त्यांनी  आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आजी, आई, पत्नी, एक मुलगा व दोन मुली, असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बांगर  यांच्या  आत्महत्येस  सरकारच  जबाबदार  असल्याचा आरोप  राष्ट्रवादी  काँग्रेसचे  परळी  विभाग  प्रमुख  गणेश  पाटील  यांनी  केला  असून  त्यांच्या  कुटुंबीयांना  तत्काळ  मदत  मिळावी  अशी मागणी केली आहे.

Web Title: Farmer suicide in Palghar District