esakal | कर्जमाफीनंतरही बळीराजा थकला ! जिल्हा बॅंकांची 23 हजार कोटींची येणेबाकी
sakal

बोलून बातमी शोधा

2Farmer_63 - Copy.jpg

विभागनिहाय येणेबाकी​
पुणे
7414.40 कोटी
नागपूर
5061.45 कोटी
नाशिक
3461.94 कोटी
कोल्हापूर
2968.60 कोटी
औरंगाबाद
2713.25 कोटी
नांदेड
1780.26 कोटी

कर्जमाफीनंतरही बळीराजा थकला ! जिल्हा बॅंकांची 23 हजार कोटींची येणेबाकी

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : कर्जमाफीनंतरही कोरोनाची स्थिती आणि अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, शेतमालांचे गडगडलेले दर, सरकारी मदतीची प्रतीक्षा या कारणांमुळे बळीराजाकडे पुन्हा कर्जाची येणेबाकी वाढली आहे. सद्यस्थितीत 29 जिल्हा बॅंकांची 23 हजार 399 कोटी 45 लाखांची येणेबाकी असून त्यात मागील खरीप हंगामातील 13 हजार 222 कोटींचा समावेश आहे. येणेबाकीत पुणे, नागपूर, नाशिक विभाग अव्वल असून त्यात दोन लाखांवरील कर्जदारांचा सर्वाधिक समावेश आहे.

विभागनिहाय येणेबाकी 
पुणे 
7414.40 कोटी 
नागपूर 
5061.45 कोटी 
नाशिक 
3461.94 कोटी 
कोल्हापूर 
2968.60 कोटी 
औरंगाबाद 
2713.25 कोटी 
नांदेड 
1780.26 कोटी

राज्यातील शेतकऱ्यांना रब्बी आणि खरीप हंगामात कर्जवाटप करण्यासाठी राज्य बॅंकेने राज्यातील जिल्हा बॅंकांसाठी नऊ हजार दोन कोटी 87 लाख रुपयांची कर्ज मर्यादा मंजूर केली. त्यातील तीन हजार 186 कोटी 86 लाख रुपये वितरीत केले आहेत. तर नाबार्डकडून जिल्हा बॅंकांना तीन हजार कोटींची कर्ज मर्यादा मंजूर झाली, परंतु त्यातील दमडाही मिळालेला नाही. दरम्यान, राज्य बॅंकेने खरीप हंगामासाठी पुणे जिल्हा बॅंकेला 194 कोटी, नगर जिल्हा बॅंकेला चारशे कोटी, कोल्हापूर जिल्हा बॅंकेला 220 कोटी, सांगली 321 कोटी, नाशिक जिल्हा बॅंकेला 329 कोटी 10 लाख, रायगडला 45 कोटी, औरंगाबाद जिल्हा बॅंकेला दोनशे कोटी, बीड बॅंकेला 37 कोटी 89 लाख, उस्मानाबाद जिल्हा बॅंकेला 182 कोटी, बुलडाणा 66 कोटी, नांदेड 75 कोटी, परभणी 100 कोटी, अकोला 450 कोटी, चंद्रपूर 232 कोटी 39 लाख, गडचिरोली 49 कोटी आणि यवतमळा जिल्हा बॅंकेला 285 कोटी 48 लाख रुपयांचे कर्ज दिले आहे. दरम्यान, राज्य बॅंकेनेही संबंधित जिल्हा बॅंकांना मार्च व जूनपर्यंत येणेबाकीची रक्‍कम भरावी, असे स्मरणपत्र दिले आहे. जूनपर्यंत वसुलीची अंतिम मुदत; येणेबाकी वसूल होईल
सध्याची कोरोनाची स्थिती आणि बळीराजासमोरील अडचणींमुळे येणेबाकी वाढली आहे. मात्र, जूनपर्यंत वसुलीची अंतिम मुदत असल्याने त्यातील बहूतांश येणेबाकी वसूल होईल. नियमित कर्जदारांना बॅंकांकडून त्यांच्या मागणीनुसार कर्ज वितरीत केले जाते. पीक कर्जवाटपासाठी पुणे जिल्हा बॅंकेला राज्य बॅंकेकडून एक हजार 350 कोटींची मर्यादा मंजूर झाली आहे. 
- प्रताप चव्हाण, सरव्यवस्थापक, पुणे जिल्हा बॅंक 

 

खरीपात 13 हजार 222 कोटींचे वाटप 
राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीच्या उद्दिष्टानुसार राज्यातील 29 जिल्हा बॅंकांनी मागील खरीप हंगामात सुमारे 23 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना 13 हजार 222 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप केले. त्यात पुणे विभागात सर्वाधिक चार हजार 919 कोटींचे तर कोल्हापूर विभागात दोन हजार 47 कोटी, नाशिक विभागात एक हजार 429 कोटी 59 लाख, औरंगाबाद विभागात एक हजार 198 कोटी 41 लाख आणि नागपूर विभागातील जिल्हा बॅंकांनी दोन हजार 674 कोटी रुपयांचे कर्जवाटप केल्याची माहिती राज्य बॅंकेकडून देण्यात आली.