‘त्या’ शेतकऱ्याची नोव्हेंबरमध्येच कर्जमाफी

‘त्या’ शेतकऱ्याची नोव्हेंबरमध्येच कर्जमाफी

मुंबई - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुष्काळ दौऱ्याच्या पहिल्या दिवशी आधी दुष्काळ; मग युतीचे बघू, असे जाहीर केल्याने एकत्र निवडणूक लढवण्याबद्दलच्या आशा जिवंत असल्याचे मत भाजप नेत्यांनी नोंदवले. मात्र, त्याचवेळी कर्जमाफी झालीच नाही, याचे उदाहरण म्हणून उभा केलेला शेतकरी नोव्हेंबरमध्येच कर्जमुक्‍त झाल्याची माहितीही उघड केली.

बाळासाहेब सोळंके असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याचे ‘एनपीए’ झालेले खाते पैसे टाकून शासनाने या अगोदरच कार्यान्वित केल्याची माहिती पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी आज उघड केली. सदर खात्याचा संपूर्ण तपशील देतानाच उद्धव ठाकरे हे विरोधी पक्षनेते नसून आमच्या मित्रपक्षाचे नेते आहेत, त्यांनी ही बाब आधीच उघड केली असती तर आम्हाला वस्तुस्थिती आधीच मांडता आली असती, असा चिमटाही त्यांनी काढला. बीड येथे आज उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या घोषणा केवळ कागदावर असतात, हे दाखवण्यासाठी बाळासाहेब सोळंके या शेतकऱ्याला सभेत उभे केले. मात्र दोन तासांतच यासंबंधातले स्पष्टीकरण करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com