विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी काढला अर्धनग्न मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 जानेवारी 2019

मुंबई : जिल्ह्यातील खंडाळा तालुक्याच्या केसुर्डीसह आसपासच्या दहा गावातील शेतकऱ्यांचा अर्धनग्न पायी मोर्चा खंडाळा तहसील कार्यालय ते मंत्रालयापर्यंत गेल्या दहा दिवसांपासून सुरू आहे.

12 जानेवारीला खंडाळा येथून या मोर्चाला सुरवात झाली. 14 जानेवारीला पुणे आयुक्तालय येथे झालेल्या चर्चेत शेतकऱ्यांच्या मागण्याचे समाधान झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोर्चा मंत्रालयाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. 

काय आहेत शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या ? 

१) MIDC टप्पा क्र ,१,२,३ मधील शेतकरयांची हरकत असलेल्या खातेधारणची जमिनी MIDC मधून वगळाव्यात.

२) MIDC मधून राहिलेल्या जमिनींना रस्ता व पाण्याची सोय करून मिळावी.

३) भूमिपुत्रांना कंपन्यांमधून कायमस्वरूपी रोजगार मिळावा.

४) MIDC टप्पा क्र. २ मधील शेतकऱ्यांना बेकार भत्ता रुपये ५०००० मिळावा. तसेच संपादित केलेल्या क्षेत्रामधील ताल, विहिर, पाईपलाइनचा मोबदला मिळावा.

५) १९९५ मध्ये नीरा देवधर प्रकल्प लाभ क्षेत्रात असलेले २५०० हेक्टर क्षेत्र २००६ साली ते वगळले आहे ते पुन्हा लाभ क्षेत्रात आणून शेतीला पाणी देणे.

Web Title: Farmers Semi Nude March for various demands