Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी वेळ मिळाला नाही म्हणून शेतकरी पुत्राने रक्ताने लिहिले निवेदन; काय आहे प्रकरण?

A statement written in blood by a farmer's son: एकनाथ शिंदे.
urvesh salunkhe
urvesh salunkhe Esakal

Eknath Shinde : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील बुधगाव येथील रहिवासी असलेल्या शेतकरी पुत्राने मुख्यमंत्र्यांना रक्ताने निवेदन लिहिले आहे. उर्वेश साळुंखे असे त्याचे नाव असुन पाडळसरे धरण पूर्ण व्हावे यासाठी त्याने हे पत्र लिहीले आहे.

गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून पाडळसरे धरणाचे काम अपूर्ण आहे. हे धरण राज्य सरकारने व केंद्र सरकारने लवकरात लवकर पूर्ण करावे. यासाठी उर्वेशने आपले स्वतःचे रक्त काढून त्या रक्ताने निवेदन तयार केले.

urvesh salunkhe
Dr Bharti Pawar : ग्रीनफिल्ड महामार्गाच्या सदोष मूल्यांकनाचे ऑडिट : डॉ. भारती पवार

उर्वेश साळुंखे हे रक्ताने लिहलेले निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देणार आहे. हे निवेदन देण्यासाठी आठ ते दहा दिवसापासून मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधत होता मात्र वेळ मिळत नसल्याचे त्याने सांगितले.

यामुळे येत्या २० ते २५ दिवसात उर्वेशला मुख्यमंत्र्यांनी वेळ न दिल्यास २६ व्या दिवशी उर्वेश साळुंखे मंत्रालयात उडी घेणार असे तो म्हणाला. उडी घेतल्यांनतर जीविताचे काही बरेवाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार राहील असेही तो म्हणाला

urvesh salunkhe
Ajit Pawar Vs Sharad Pawar: राष्ट्रवादी कोणाची? आज होणार सुणावणी; शरद पवार गटाकडे अधिकचे शपथपत्र; मात्र..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com