वर्षानंतरही 53 हजार शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा 

तात्या लांडगे
रविवार, 15 जुलै 2018

आकडे बोलतात... 
एकूण बाधित शेतकरी 
सुमारे 3,32,729 
मदत मिळणारे शेतकरी 
2,79,422 
मदतीची रक्‍कम 
110.09 कोटी 
प्रतीक्षेतील शेतकरी 
53,307

सोलापूर : एप्रिल ते ऑक्‍टोबर 2017 या कालावधीत अतिवृष्टी व अवेळी पडलेल्या पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील दोन लाख 79 हजार 522 शेतकऱ्यांसाठी शासनाने 110 कोटी नऊ लाख रुपयांच्या मदतीला जून 2018 मध्ये मंत्रिमंडळाने मान्यता दिली. परंतु, त्यापैकी बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही रक्‍कम वर्ग झालेली नाही. दुसरीकडे मार्च 2017 मधील बहुतांश शेतकऱ्यांना वर्षानंतरही भरपाईची प्रतीक्षा आहे. 

अवकाळी पाऊस अथवा अतिवृष्टी अशा नैसर्गिक संकटात हातातोंडाशी आलेले पिकांचेही नुकसान झाले. मागील वर्षापासून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वेळेवर आणि नुकसानीएवढी भरपाई मिळत नाही. तसेच कर्जमाफीचा लाभ नाही, बॅंकांकडून नव्याने पुरेसे कर्ज मिळत नाही, दुधाचे दर कमी, शेतीमालाचे दर घसरले, तूर-हरभऱ्याच्या हमीभावाचे पैसे नाहीत, सद्यस्थितीत खरीप पेरणीसाठी पुरेसा पाऊस नाही, पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी ऑनलाइन सात-बाऱ्याचे सर्व्हर डाऊनमुळे अर्जही भरता येत नाही, यासह अन्य कारणांमुळे शेतकरी संकटाच्या चक्रव्यूहात सापडला आहे.

शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून शेतकऱ्यांच्या मतावर लोकप्रतिनिधी झालेले त्यांच्या स्वत:च्या मानधनासाठी भांडतात, परंतु आमच्या प्रश्‍नांवर गप्प का, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करीत आहेत. 

विभागनिहाय मदत मिळणारे शेतकरी 
विभाग शेतकरी मदतीची रक्‍कम 
कोकण 2,12,818 57.76 कोटी 
नाशिक 69,467 40.58 कोटी 
नागपूर 10,682 3.95 कोटी 
पुणे 7,010 4.29 कोटी 
औरंगाबाद 4,920 2.83 कोटी 
अमरावती 1,508 67.21 लाख 

आकडे बोलतात... 
एकूण बाधित शेतकरी 
सुमारे 3,32,729 
मदत मिळणारे शेतकरी 
2,79,422 
मदतीची रक्‍कम 
110.09 कोटी 
प्रतीक्षेतील शेतकरी 
53,307

Web Title: farmers wait for package on government