शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार महिना अखेरपर्यंत

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 3 July 2020

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून जुलै अखेरपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळेल, असे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

मुंबई - महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून जुलै अखेरपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळेल, असे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. या योजनेची अंमलबजावणी सुरू असताना कोरोनाव्हायरसचे संकट आले. त्यामुळे राज्यामध्ये लॉकडाउन जाहीर झाले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या नियमांमुळे योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या आणि तिसऱ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यास उशीर झाला. 

लॉकडाउनमुळे महावितरण आर्थिक संकटात

आता ही प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी दोन हजार कोटी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. जुलै अखेरपर्यंत सव्वा ११ लाख शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात ८ हजार २०० कोटी रुपये रक्कम वर्ग करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

पीडितांच्या तक्रारीसाठी स्वतंत्र व्यवस्था हवी - गोऱ्हे

सहकार मंत्र्यांच्या सूचना

  • योजनेचा लाभ मिळाला नाही अशा शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी
  • कोरोनामुळे कर्जमुक्तीचा लाभ न मिळालेल्या कर्जदार शेतकऱ्यांना बँकांनी खरीप कर्ज द्यावे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers will get the benefit of debt relief till the end of the month