
अजित देसाई, सिन्नर: मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील खंबाळे शिवारात बुधवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. यात भरधाव कार पुढे चालणाऱ्या कंटेनर खाली घुसल्याने झालेल्या अपघातात कारमधील दोघांच्या मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनं खळबळ उडाली आहे.