
साळाव रोहा मार्गावर ताडगाव इथं विहिरीत विष टाकल्याच्या संशयावरून पती-पत्नीवर गुन्हा दाखल झाला आहे. अखलाख आयुब खान आणि रेश्मा अखलाख खान अशी दोघांची नावे आहेत. सध्या नेरूळ सी वूड्स दारावे इथं ते राहतात. तर मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातले केळशी इथले आहेत. मुलीचं प्रेमप्रकरण असून त्याला दोघांचाही विरोध आहेत. यातूनच दोघांनी विहिरीत विटा टाकण्याचा प्रकार केला आहे.