Patients Free to Buy Medicines from Any Pharmacy
ESAKAL
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा आता रुग्णालयांकडे वळवला आहे. रुग्णालयातील फार्मसीमधूनच औषधे खरेदी करणे कायद्याने बंधनकारक असून औषधे कुठून खरेदी करायची हा रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांचा मूलभूत अधिकार आहे, असे आदेश त्यांनी जारी केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.