
मुंबई : फूड डिलीव्हरी ॲप्सच्या मनमानीवर अंकुश ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठे पाऊल उचलले आहे. आता ऑनलाईन जेवण किंवा नाश्ता ऑर्डर करताना ग्राहकांना रेस्टॉरंटची सरकारी रेटिंगही पाहायला मिळणार आहे. त्यामुळे, संबंधित रेस्टॉरंटमधील अन्नाची गुणवत्ता कशी आहे, याची माहिती थेट ग्राहकांना मिळेल. त्याचबरोबर पसंतीच्या रेस्टॉरंटमधीलच पदार्थ ग्राहकांपर्यंत पोहोचतील, याची खात्री राहील.