

Copy Free Maharashtra: अवघ्या चार दिवसांवर बारावीची परीक्षा आली आणि याच अनुषंगानं राबविण्यात येत असलेल्या कॉपीमुक्त अभियानावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कारण परभणीतील ज्ञानोपासक महाविद्यालयाचे उपप्राचार्य विजय घोडके यांनी आम्हाला कॉपीमुक्त अभियान राबवायचा आहे. केंद्र संचालक म्हणून ज्या सेंटरवर जायचे आहे, तिथे हत्यारबंद बंदोबस्त द्या. अन्यथा आमचा संतोष देशमुख होऊ शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.