

Films Play Key Role In Strengthening India Russia Cultural Ties Says Gorelek At Special Cultural Interaction
sakal
मुंबई : भारतीय चित्रपटांमधील कथेत प्रेमभावना असते. कुटुंब, व्यक्ती, समाज याबद्दलची आत्मीयता पाहायला मिळते. ही प्रेमभावनाच रशियातील प्रेक्षकांना भारतीय चित्रपटाशी जोडते. सोव्हिएत काळापासून भारत आणि रशियाचे सांस्कृतिक बंध चित्रपटांमुळे दृढ झाले आहेत, असे प्रतिपादन रशियाचे मुंबईतील उपवाणिज्यदूत व्हिक्टर गोरेलेख यांनी केले. ‘फ्रेम ऑफ सिव्हिलायझेशन’ या सत्रामध्ये भारत आणि रशिया या देशांतील चित्रपट या विषयावर व्हिक्टर यांनी आपले विचार मांडले.